Amol Mitkari On BJP-Shivsena: लोकसभा निवडणुकाचा निकाल समोर आला आहे. या निकालात महायुतीला धक्का देत महाविकास आघाडीने महाराष्ट्रात घवघवीत यश मिळवलं आहे. त्यामुळे आता महायुतीमधील मित्रपक्षांची अतंर्गत धुसफूस बाहेर आल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी मित्रपक्षांवर केलेल्या जुन्या आरोपांवर ठाम असल्याचा पुनरुच्चार केला आहे.
राज्यात अजित पवारांना (Ajit Pawar) भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची मते मिळाली नसल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी मोठी खळबळ उडून दिली होती. दरम्यान, आपण आपल्या आरोपांवर आजही ठाम असल्याचं अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. शिवाय या संदर्भातील आपल्याकडे काही गोष्टी आणि पुरावे पुढच्या दोन दिवसात पक्षश्रेष्ठींना भेटून देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
आमदार मिटकरी यांनी अकोल्याचे भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित खासदार अनुप धोत्रे यांची त्यांच्या घरी भेट घेऊन विजयाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान अजितदादांचे काही आमदार शरद पवार आणि भाजपच्या संपर्कात असल्याच्या रोहित पवारांच्या दाव्यावरही त्यांनी जोरदार पलटवार केला.
लोकसभेतील विजयाची हवा रोहित पवारांच्या डोक्यात शिरल्यानेच ते अशी बालीश विधानं करत आहेत. असा टोला त्यांनी रोहित पवारांना लगावला. तर बारामतीतील सुनेत्रा पवार यांचा पराभव हा राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आपल्या आईच्या पराभवासारखा असून. राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता या पराभवाचा बदला विधानसभेत घेणार असल्याची प्रतिज्ञाही मिटकरींनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.