Maharashtra Assembly Election : लोकसभेचा इम्पॅक्ट विधानसभेतही; महाराष्ट्रात सत्तांतर होणार?

Mahavikas Aghadi Va Mahayuti : लोकसभेत महायुतीची धूळधाण झाली, तर महाविकास आघाडीला 48 पैकी 31 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे ठाकरे गट काँग्रेस आणि शरद पवार गटास राज्यात सत्ता स्थापनेचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar Uddhav Thackeray Sharad Pawar Nana Patole
Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar Uddhav Thackeray Sharad Pawar Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : देशात लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर राज्यात आता विधानसभेचे वारे वाहू लागले आहे. लोकसभेत महायुतीची धूळधाण झाली, तर महाविकास आघाडीला 48 पैकी 31 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे ठाकरे गट काँग्रेस आणि शरद पवार गटास राज्यात सत्ता स्थापनेचा विश्वास व्यक्त केला जात आहे. आता त्यांच्या या विश्वासाला एका पोलचाही सपोर्ट मिळत असल्याचे पुढे आले आहे.

लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे विश्लेषण करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी Devendra Fadnavis विधानसभेत महायुतीला 130 जागा मिळतील, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यासाठी त्यांनी महायुतीला झालेल्या मतदानाचे आकडे सांगितले. दुसरीकडे काँग्रेसने मात्र लोकसभेवरून विधानसभेत महाविकास आघाडीला 150 जागा मिळण्याचा दावा केला आहे. दोन्ही बाजूने विधानसभेत आपणच येणार असल्याचे बोलले जात आहेत. यात समोर आलेल्या पोलनेही महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे.

राज्यात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून सत्तास्थापनेसाठी 145 चा आकडा पार करणे गरजेचे आहे. लोकसभेच्या निकालानुसार राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला कौल मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विधानभेत महाविकास आघाडीला 158 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महायुतीला 127 जागा मिळतील. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar Uddhav Thackeray Sharad Pawar Nana Patole
NCP Sharad Pawar : 'होय... जयंत पाटीलच सेनापती!' ; मुंबईतून थेट रोहित पवारांनाच पत्र

सध्या महायुतीतील भाजपचे 105, शिंदे गटाचे 40 तर अजित पवार गटाचे 40 आमदार आहेत. पोलनुसार भाजपच्या 42 जागांवर, शिंदेंच्या 17 तर अजित पवार गटाच्या 25 जगांवर आघाडीला यश मिळणार असल्याचे सांगण्यात येते. चार महिन्यावर आलेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटास 30, काँग्रेसला 72 तर शरद पवार Sharad Pawar गटास 52 आमदार निवडून येण्याची शक्यताही या पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar Uddhav Thackeray Sharad Pawar Nana Patole
Bajrang Sonwane Vs Amol Mitkari : बीडच्या 'बाप्पा'नं मिटकरींना झापलं; 'मी मरेपर्यंत पवारांसोबतच; पण त्यांनी एखादा ग्रामपंचायत...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com