Shivaji Sawant sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Politics : सावंतांनी उल्लेख केलेला ‘तो नवा नेता’ कोण अन्‌ त्यांचा इशारा कोणाला...?

सरकारनामा ब्यूरो

Solapur News : सावंत बंधूंनी यापूर्वीही अनेकांना निवडून आणण्यात महत्वाची भूमिका निभावली आहे. मात्र, काहीजण नव्याने सोबत आलेल्या नेत्यांच्या भरवशावर निवडणूक लढवण्याच्या वल्गना करीत आहेत. त्यांचे सर्व गैरसमज आगामी काळात दूर होतील, असा इशारा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनी दिला. सावंत यांनी उल्लेख केलेला 'तो' नेता कोण आणि तो इशारा त्यांनी कोणाला दिला?, अशी चर्चा सोलापूरच्या राजकारणात रंगली आहे. (Let us show the strength of the Sawant brothers in upcoming elections: Shivaji Sawant)

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (शिंदे गट) सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्या बैठकीत बोलताना शिवाजी सावंत यांनी सावंत बंधूंची ताकद आणि इतर मुद्यावर भाष्य केले.

सावंत म्हणाले की, सावंत बंधूंनी यापूर्वीही अनेकांना निवडून आणण्यात महत्वाची भूमिका निभावली आहे. पराभवाच्या छायेत असलेल्या अनेक उमेदवारांना आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आपल्या वैयक्तिक जनसंपर्काच्या जोरावर विजयश्री मिळवून दिली आहे. आगामी निवडणुकीतही सावंतांची ताकद दाखवून देण्यात येईल.

सोलापूर शहर जिल्ह्यासह धाराशिव, पुणे, बीड, परभणी या जिल्ह्यांमध्ये सावंत बंधूंची पर्यायाने शिवसेनेची ताकद आगामी निवडणुकीत दाखवून देण्यात येईल. यापूर्वीही अनेकांना निवडून आणण्यात सावंत बंधूंनी सिंहांचा वाटा उचलेला आहे, हे कोणी विसरू नये, असेही त्यांनी सुनावले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या सूचनेनुसार आगामी काळात निवडणुकीत यश मिळवण्यासाठी शिवसैनिकांनी कार्यरत राहावे. आगामी लोकसभा निवडणूक शिवसेनेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी शाखा विस्तार, विकासकामे, लोकसंपर्क आणि पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही सावंत यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT