India Aghadi Meeting : लालूप्रसाद यादव इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दोन दिवस आधीच मुंबईत दाखल

Lalu Prasad Yadav News : लालूप्रसाद यादव यांच्यासोबत बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादवही आले आहेत
Lalu Prasad Yadav
Lalu Prasad Yadav Sarkarnama

Mumbai News : मुंबईत गुरुवारी (ता. ३१ ऑगस्ट) आणि शुक्रवारी (ता. १ सप्टेंबर) देशातील विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष तथा बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे दोन दिवस अगोदरच मुंबईत पोचले आहेत. (Lalu Prasad Yadav reached Mumbai two days earlier for the meeting of the India Aghadi)

यादव पिता-पुत्रांचे मुंबईत काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम, माजी मंत्री बाबा सिद्दिकी, शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी मुंबई विमानतळावर स्वागत केले. मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष असणार आहे.

Lalu Prasad Yadav
Solapur Loksabha : प्रणिती शिंदे यांचे लोकसभा निवडणूक लढविण्याचे संकेत

दरम्यान, याच बैठकीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची इंडिया आघाडीच्या संयोजकपदी वर्णी लागणार असल्यचे सांगितले जात आहे. आघाडीतील सर्व पक्षांनी खर्गे यांच्या नावाला संमती दिल्याचे सांगितले जात आहे. खर्गे यांच्या रुपाने इंडिया आघाडीला दलित चेहरा देण्याचा काँग्रेस आणि मित्रपक्षांचा प्रयत्न आहे.

Lalu Prasad Yadav
India Aghadi News : इंडिया आघाडीचे संयोजकपद काँग्रेसकडे; ‘या’ नेत्याची लागणार वर्णी...

चारा घोटाळा प्रकरणात लालूप्रसाद यादव हे सध्या जामिनावर तुरुंगाच्या बाहेर आहेत. त्यांचा जामीन रद्द करण्यात यावा, यासाठी सीबीआयाने नुकतीच न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतरसुद्धा यादव यांनी भाजपविरोधात लढण्याची भूमिका कायम ठेवली आहे. लालूप्रसाद यादव इंडिया आघाडीच्या पहिल्या बैठकीपासून सक्रिय आहेत. त्यांनी आतापर्यंत झालेल्या सर्व बैठकांना आजारी असूनही हजेरी लावलेली आहे.

Lalu Prasad Yadav
Walse Patil On Pawar : शरद पवार माझ्या हृदयात, यापुढे त्यांच्या विरोधात एक शब्दही बोलणार नाही; वळसे पाटील यांची भूमिका

इंडिया आघाडीच्या लोगोचेही अनावरण मुंबईत होणाऱ्या बैठकीत केले जाणार आहे. तो कसा असणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असणार आहे. इंडिया आघाडीचे संयोजकपद काँग्रेसकडे गेल्यानंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार हा काँग्रेसचा असणार की घटक पक्षांचा याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com