Harsvardhan Patil
Harsvardhan Patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

केंद्राप्रमाणे राज्य सरकारनेही कारखान्यांना व्याज परतावा द्यावा... हर्षवर्धन पाटील

हेमंत पवार

कऱ्हाड : केंद्र सरकारने साखर कारखान्यांसाठी व्याज परतावा योजना सुरु केली आहे. त्यामुळे राज्य शासनाचा महसूल वाढवणार आहे. केंद्राप्रमाणेच राज्य सरकारने सहा टक्के व्याज भरून महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना सहकार्य करावे, अशी मागणी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी कऱ्हाड (जि. सातारा) येथे केली.

विधान परिषदेचे माजी सदस्य आनंदराव पाटील यांच्या निवासस्थानी मंत्री पाटील यांनी गुरूवारी भेट दिली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. श्री. पाटील म्हणाले, ''सहकाराला ताकद देण्यासाठी केंद्र सरकारने स्वतंत्र सहकार खाते सुरु केले आहे. मंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारने डिस्टलरी विस्तारीकरणासह कारखान्याचे उत्पन्न वाढीस मदत देण्यासाठी व्याज परतावा योजना आणली आहे. या योजनेतंर्गत सहा टक्के व्याज केंद्र सरकार भरणार आहे. तर सहा टक्के व्याज कारखान्यांना भरावे लागणार आहे.''

या योजनेंतर्गत देशभरात ४५ हजार कोटींचे प्रकल्पही मंजूर झाले आहेत. त्यामुळे कारखानदारीस चांगले दिवस येणार आहेत. याचा राज्य शासनाच्या महसूल वाढीवर मोठा सकारात्मक परिणाम होणार आहे. त्यामुळेच राज्य शासनानेही सहा टक्के व्याज परतावा दिला पाहिजे. ते म्हणाले, ''केंद्र सरकारने प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सहकार खात्याला स्वतंत्र दर्जा दिला. त्याचा राज्यातील कारखानदारीस मोठा फायदा झाला आहे.''

''राज्यातील कारखान्यांवर नऊ हजार चारशे कोटींचा इनकम टॅक्स लावण्यात आला होता. तो केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी रद्द केल्याने राज्यातील शेतकर्‍यांना व कारखान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीस प्राधान्य दिल्याने साखर कारखान्यांना फायदा होत असून शेतकर्‍यांनाही जादा दर देणे शक्य होत आहे बाजार समितीचे संचालक सुनिल पाटील, मानसिंग पाटील, प्रताप पाटील उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT