Harshvardhan Patil, Amol Kolhe Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Amol Kolhe In Satara : चिमुकल्याचा खासदार अमोल कोल्हेंना राजकीय सल्ला; म्हणाला, 'शरद पवारांची साथ...'

Sharad Pawar NCP : 'उद्याच्या पिढ्या राजकीयदृष्ट्या प्रगल्भ होऊ शकतात, याची पोचपावती मिळाली'

Sunil Balasaheb Dhumal

Satara Political News : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पक्षातील अनेक बिनीच्या शिलेदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची साथ दिली. आजी-माजी आमदार मोठ्या प्रमाणत अजितदादांच्या गटात सहभागी झाले आहेत. काही मोजके आमदार, खासदारांनी ज्येष्ठ नेते शरद पवारांची साथ कायम ठेवणे पसंद केले. यात पदाधिकाऱ्यांमुळे अजित पवारांचे पारडे जड असले तरी कार्यकर्त्यांची मोठी फळी पवारांसोबत असल्याचे बोलले जात आहे. अशा स्थितीत एका मुलाने खासदार अमोल कोल्हे यांना थेट राजकीय सल्ला दिला आहे. (Latest Political News)

साताऱ्यातील एका कार्यक्रमात खासदार कोल्हे उपस्थित होते. त्यावेळी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी एका मुलाने थेट कोल्हेंच्या कानात जाऊन त्यांना राजकिय सल्ला देण्याचे धारिष्ट्य दाखवले. याबद्दलही स्वतः कोल्हेंनी त्या मुलाचे कौतुक केले आहे. पुरस्कार वितरण कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील या मुलाने कोल्हेंच्या कानात सांगितले की, (Sharad Pawar) शरद पवारांची साथ सोडू नका. यामुळे कोल्हेंनी हर्षवर्धनचे तोंडभरून कौतुक केले.

अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले, 'एक चिमुकला उठला आणि कानात काहीतरी सांगतले. त्याचे कौतुक वाटले की, आजच्या पिढीत एखाद्या खासदाराच्या कानात सांगण्याची धिटाई आली आहे. त्याहूनही जास्त बरे वाटले की, त्याच्या सांगण्यावरून त्या घरातील राजकीय सजगता समजते. त्याने हळूच कानात सांगितले की, तेवढे पवारसाहेबांना सोडू नका. हा माझ्यासाठी शॉक होता. मात्र, समाजात जे काही घडते त्याबाबत घरातून जाणिवा प्रगल्भ केल्या तर उद्याच्या पिढ्या राजकीय विचार करण्यासाठी प्रगल्भ होऊ शकतात, याची पोचपावती मिळाली.'

सध्या राज्यात पक्षफुटीच्या राजकारणामुळे कोण काेणाबरोबर आहे, याबाबत सामान्य नागरिकांच्या मनात शंका-कुशंका आहेत. अशा स्थितीत राजकीय मंडळींच्या वक्तव्यामुळेही संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे. अशा स्थितीत एका मुलाने थेट खासदारांना राजकीय स्थितीवर सल्ला दिल्याने उपस्थितांतून त्याचे कौतुक झाले, तर स्वतः खासदार कोल्हेंनीही हर्षवर्धनसह त्यांच्या कुटुंबीयांबाबत गौरवोद्गार काढले. कोल्हेंचा हा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT