PM Modi Rally News : पंतप्रधान नरेंद्र मोदी इलेक्शन मोडवर; छत्तीसगड अन् तेलंगणाचा दौरा...

Chhattisgarh And Telangana News : "जगदलपूर इथं 24 हजार कोटी रुपयांच्या आणि तेलंगणातील निजामाबाद इथं 8 हजार कोटी रुपयांच्या कामाचं उद्घाटन"
PM Narendra Modi Rally News
PM Narendra Modi Rally NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhattisgarh News : लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. तसेच मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा, मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकांकडे लोकसभेची रंगीत तालीम म्हणूनदेखील पाहिले जात आहे. या पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचाराचा धुरळा उडवण्यासाठी सज्ज झाले असून, इलेक्शन मोडवर आले आहेत. (Latest Marathi)

PM Narendra Modi Rally News
Tembhu Water Issue : ना राष्ट्रवादी ना भाजप, शिंदे गटानेच मारली बाजी; टेंभू पाणी योजनेला अखेर मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तेलंगणा आणि छत्तीसगडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यामुळे आता मोदी आता इलेक्शन मोडवर आल्याने एकप्रकारे प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका या वर्षअखेरीस पार पडणार आहेत. आज मोदी छत्तीसगडमध्ये जगदलपूर इथं 24 हजार कोटी रुपयांच्या आणि तेलंगणातील निजामाबाद इथं 8 हजार कोटी रुपयांच्या कामाचं उद्घाटन आणि भूमिपूजन करणार आहेत.

PM Narendra Modi Rally News
Mahatama Gandhi Birth Anniversary : महात्मा गांधीजींच्या 154व्या जयंतीनिमित्त; पंतप्रधान मोदी राजघाटावर अभिवादन !
PM Narendra Modi Rally News
Raj Thackeray On Nanded Hospital : आरोग्य 'व्हेंटिलेटर'वर असेल, तर 'ट्रिपल इंजिन'चा उपयोग काय? राज ठाकरेंचा खडा सवाल

देशातील पाच राज्यांच्या आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी भाजपने सुरू केली आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांचे दौरे करणार आहेत. यामुळे आता भाजपच्या प्रचाराचा प्रमुख चेहरा मोदी हेच असून, त्यांच्याच नेतृत्वाखाली पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजप प्रचार करणार आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com