ajit pawar dhairyashil mohite patil sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ajit Pawar Vs Mohite Patil : "मोहिते-पाटील स्वार्थी अन् मतलबी," अजितदादांच्या नेत्याची जहरी टीका

Akshay Sabale

मोहिते-पाटील कुटुंबाला अगोदरच अधोगती लागली आहे. पण, भाजपबरोबर गेल्यानं कुठंतरी बूस्टर मोहिते-पाटलांना मिळाला होता. आता तो बूस्टरही राहणार नाही. मोहिते-पाटलांना विनाशकाले विपरीत बुद्धी सुचली असेच म्हणावे लागेल, असा घणाघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रसचे प्रवक्ते उमेश पाटील ( Umesh Patil ) यांनी केला.

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राम सातपुते ( Ram Satpute ) यांचा प्रचार उमेश पाटील करत आहेत. तेव्हा एका वृत्तवाहिनीशी त्यांनी संवाद साधला. उमेश पाटील म्हणाले, "मोहिते-पाटील स्वार्थी आणि मतलबी असल्याचं प्रदर्शन पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्याला पाहायला मिळालं. सत्ता पाहून वेगवेगळ्या पातळीवर स्वत:चा बचाव करणं, अडचणी दूर करणं, निधी आणि संरक्षण मिळवण्यासाठी मोहिते-पाटील भाजपबरोबर आले होते."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याबद्दल ( Vijaysingh Mohite Patil ) सोलापूर जिल्ह्याला आदर आहे. पण, बाळसिंह मोहिते-पाटील यांच्या मुलाचा विजय चौकातून ग्रामपंचायतीला पराभव होतो. एवढी दुर्दैव परिस्थिती मोहिते-पाटलांच्या पुढील पिढीनं आणली आहे. मोहिते-पाटलांची दर्पोक्ती संध्याकाळी सातनंतरच असते. त्यामुळे दिवसा मोहिते-पाटील काही बोलले, तर गांभीर्यानं घेण्याची गरज नाही," अशा शब्दांत उमेश पाटलांनी खिल्ली उडवली आहे.

"मोहिते-पाटलांच्या हातात जिल्ह्याचं आणि विधानसभेचं राजकारण राहिलं नाही. तालुक्यापुरते ते मर्यादित झाले आहेत. उत्तमराव जानकरांची ( Uttam Jankar ) साथ मिळाल्यानं लोकसभेला रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना एक लाखांचं लीड देऊ शकले. पण, उत्तमराव जानकर विधानसभेला राम सातपुतेंच्या विरोधात उभे होते. तेव्हा, राम सातपुतेंना फक्त दोन हजारांचं लीड मोहिते-पाटील देऊ शकले. यांची ताकद सगळ्यांना माहिती आहे. पश्चिम महाराष्ट्रात जयंत पाटील सोडले, तर एकही नेता शरद पवार यांच्याबरोबर राहिला नाही," असंही उमेश पाटलांनी म्हटलं.

"विजयदादांच्या सांगण्यावरून एका रात्रीत आमदार केलं. आता हे पार्सल बीडमध्ये पाठवणार," असा इशारा धैर्यशील मोहिते-पाटलांनी राम सातपुतेंना दिला आहे. यावर उमेश पाटील म्हणाले, "ही चावून चोथा झालेली टीका आहे. राहुल गांधी वायनाडमध्ये लढत आहेत. नरेंद्र मोदी गुजरातचे असून वाराणसीमधून लढत आहेत. त्यामुळे एखादा नेते दुसऱ्या मतदारसंघात जाऊन निवडणूक लढवतो, तेव्हा स्थानिक आणि बाहेरचे, असं काही नसतं. ही ग्रामपंचायतीची निवडणूक नाही."

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT