Praniti Shinde News : मोहिते-पाटलांच्या बालेकिल्ल्यातून प्रणिती शिंदेंचा एल्गार; म्हणाल्या, "अकलूज अन् सोलापूर एकत्र आल्यावर..."

Dhairyasheel Mohite Patil News : माढ्यातून धैर्यशील मोहिते-पाटील आणि सोलापुरातून प्रणिती शिंदे लोकसभा निवडणूक लढत आहेत.
Praniti Shinde
Praniti ShindeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics News : माढा लोकसभा मतदारसंघातील (Madha Lok Sabha Election 2024) उमेदवारीवरून भाजपमध्ये सुरू असलेल्या राजकीय धुसफुसीचे पर्यावसन स्थित्यंतरात झाले. पाच वर्षांपूर्वी उमेदवारीवरून राष्ट्रवादी विरोधात बंडाचे निशाण फडकविणाऱ्या मोहिते-पाटलांची शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीत पुन्हा घरावापसी झाली.

त्यानंतर आता सोलापूर आणि अकलूज एकत्र येतं, तेव्हा काय होतं? हे दाखवून देऊयात. ते जुने दिवस आज परत आणण्याची गरज आहे, असा एल्गार सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी केला आहे.

प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी अकलूजमध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील (Vijaysingh Mohite Patil) यांची 'शिवरत्न' बंगल्यावर भेट घेतली. यानंतर प्रणिती यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे.

प्रणिती शिंदे म्हणाल्या, "विजयदादा आणि अकलूजकरांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आले आहे. यापेक्षा आम्ही जास्त काय मागू शकतो. पण, अकलूज आणि सोलापूर एकत्र आल्यावर काय होतं, ते दाखवून देऊया. जुने दिवस परत आणण्याची गरज आहे."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"शरद पवार यांच्या आशीर्वादानं आपण कामाला लागूया. वैचारिक तत्त्वांवर ही लढाई लढायची आहे. आपला विजय निश्चित आहे," असा विश्वास प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला.

दरम्यान, रविवारी माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या व्यूव्हरचनेसाठी शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह प्रमुख नेत्यांची शिवरत्न बंगल्यावर तीन तास खलबतं झाली.

यानंतर धैर्यशील मोहिते-पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. अकलूजकरांच्या नव्या राजकीय भूमिकेमुळे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी मिळणार आहे.

Praniti Shinde
Jayant Patil News : 'उत्तम जानकरांचं अन् माझं ठरलंय!' जयंत पाटलांनी वाढवली भाजपची धडधड

प्रवेशानंतर धैर्यशील मोहिते-पाटील यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार राम सातपुते यांच्यावर सडकून टीका केली. ठनीरा देवघर, कृष्णा-भीमा स्थिरीकरण, पंढरपूर लोणंद रेल्वे आदी कामांचे खोटे श्रेय निंबाळकर घेत आहेत.

माढा मतदारसंघात एक लाख कोटी रुपयांची कामे आणल्याचं सांगतात. म्हणजे तासाला 1 हजार कोटींची कामे झाली, ती दाखवावीत," असं आव्हान धैर्यशील मोहिते-पाटलांनी खासदार निंबाळकरांना दिलं.

70 ते 75 वर्षांत विकासकामे झाली नाहीत, असं विधान राम सातपुतेंनी केलं होतं. याला खरपूस समाचार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी घेतला. "विजयदादांच्या सांगण्यावरून एका रात्रीत आमदार केलं. आता हे पार्सल बीडमध्ये पाठवणार," असा इशारा धैर्यशील मोहिते-पाटलांनी राम सातपुतेंना दिला आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com