sanjay mandlik dhananjay mahadik sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Lok Sabha Election 2024 : "महाडिकांना विरोध करून चूक केली, आता मात्र मंडलिक नको"

Sanjay Mandlik Latest News : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून मंडलिकांना उमेदवारी मिळणार की नाही, यासंदर्भात अजूनही संभ्रम आहे.

Rahul Gadkar

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील ( Kolhapur Lok Sabha Constituency ) विद्यमान खासदार संजय मंडलिक ( Sanjay Mandlik ) यांच्या विरोधात नाराजीचा सूर सुरूच आहे. त्यात महायुतीमधील भाजपच्या एका नेत्याने उघड-उघड मंडलिक यांना पुन्हा उमेदवारी देण्यास विरोध केला आहे. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि चंदगडमधील भाजपचे नेते संग्रामसिंह कुपेकर ( Sangramsingh Kupekar ) यांनी मंडलिक यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये, अशी मागणीच वरिष्ठांकडे केली आहे. रविवारी ( 17 मार्च ) त्यांनी गडहिंग्लजजवळील हसुर चंपू येथे मेळावा घेत आपली भूमिका मांडली.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात ( Kolhapur Lok Sabha Constituency ) सध्या उमेदवार बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मंडलिक ( Sanjay Mandlik ) यांना उमेदवारी मिळणार की नाही, याबाबत अजूनही संभ्रम आहे. त्यांचा मतदारसंघात जनसंपर्क नसल्याने आणि विकासकामांबाबत जनतेत नाराजी असल्याचे समोर येत आहे. दिवसेंदिवस त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना भाजपचे कोल्हापूर जिल्ह्यातील नेते संग्रामसिंह कुपेकर यांनी थेट मंडलिक यांच्या उमेदवारीलाच विरोध केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"2019 च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही संजय मंडलिक यांच्या प्रचारात आघाडीवर होतो. लोकांच्या दारात आम्ही मत मागण्यासाठी गेलो. पण, गेल्या पाच वर्षांत मंडलिक यांच्याकडून कोणताही जनसंपर्क आणि विकासकामे झालेली नाहीत. धनंजय महाडिक यांना विरोध करून आमची चूक झाली. याचा पश्चाताप आम्हाला होत आहे. मात्र, यंदा ती चूक आम्ही पुन्हा करणार नाही. त्यामुळे मंडलिक यांच्या ठिकाणी दुसरा कोणताही उमेदवार द्यावा, त्याला निवडून आणू," अशी भूमिका कुपेकर यांनी मांडली.

...म्हणून भाजपमध्ये प्रवेश

2019 च्या लोकसभा निवडणुकीत संग्रामसिंह कुपेकर हे शिवसेनेत होते. त्यामुळे युतीत मंडलिक यांना मदत करण्यात आली. पण, निवडून आल्यानंतर मंडलिकांनी बहिणीचे पती राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील यांना मदत केल्याचा आरोप कुपेकर यांनी करत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT