MLA Satej Patil : 'उद्या माझ्यासोबत स्टेजवर कोण येईल...' ; सतेज पाटलांचं सूचक विधान!

Satej Patil Vs Sanjay Mandalik News : 'एकदा उमेदवारी निश्चित होऊ दे, मग..' असंही आमदार सतेज पाटील म्हणाले आहेत.
Satej Patil
Satej PatilSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Loksabha Election 2024 : शिवसेनेचे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांनी एका टॅग लाइनवर उमेदवार निवडून आणता येत नाही, अशा पद्धतीचे विधान केल्यानंतर त्यावर काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी सूचक विधान केलं आहे. खासदार संजय मंडलिक यांच्या विधानावर मी काही भाष्य करणार नाही. खासदार मंडलिक यांच्या भूमिकेवर बोलण्यास नकार देत सतेज पाटील यांनी 'उद्या माझ्या स्टेजवर कोण येईल हे सांगता येत नाही.' असे सूचक विधान केले आहे.

तसेच 'जोपर्यंत महायुतीमध्ये उमेदवार अंतिम होत नाही. तोपर्यंत मी बोलणार नाही. त्यांच्याकडे विळा-भोपळ्याचे नाते आहे, एकदा उमेदवारी निश्चित होऊ दे, मग सर्वकाही उघडपणे सांगतो.' अशा शब्दांत आमदार सतेज पाटील(Satej Patil) यांनी प्रतिक्रिया दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Satej Patil
Lok Sabha Election 2024 : हातकणंगलेत तिरंगी लढतीचा धुराळा ? 'मातोश्री'चा आदेश अन् मविआची सूत्रे वेगाने फिरली

हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची भूमिका ठाम आहे. त्यावर विचारलेल्या प्रश्नावर सतेज पाटील यांनी, राजू शेट्टी(Raju Shetty) यांच्याशी उद्धव ठाकरे चर्चा करत आहेत. जो काही निर्णय उद्धव ठाकरे घेतील, त्यासोबत महाविकास आघाडी एकत्र काम करेल. मुंबईत राहुल गांधी यांची सभा झाल्यानंतर उमेदवार घोषित होतील, असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.

राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक(Dhananjaya Mahadik) यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून बोलताना, आमदार सतेज पाटील यांचे नाव न घेता काँग्रेसकडे जागा जात असताना आपल्या गळ्यातील माळ दुसऱ्यांच्या गळ्यात घातली. त्यांच्यात निवडणूक लढवण्याचा दम नाही, अशी टीका केल्यानंतर त्याला सतेज पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Satej Patil
Kolhapur Lok Sabha Election 2024 : शाहू महाराज विरुद्ध समरजीत घाटगे सामना होणार? महाडिकांनी दिले संकेत!

'तीन महिन्यांपूर्वी महाडिक यांनी हे आव्हान दिले असते तर मी स्वीकारले असते. आव्हानाला घाबरणारा बंटी पाटील नाही. मैदान सोडून पळून जाणाऱ्यातला मी नाही,' अशा शब्दांत आमदार पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com