Satej Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : लोकसभा आढावा बैठकीत सतेज पाटलांचा फोटो गायब; पदाधिकारी संतापले

Satej Patil : सतेज पाटील हे विधान परिषदेचे काँग्रेसचे गटनेते असून दुर्लक्ष...

Rahul Gadkar

Kolhapur News : लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पश्‍चिम महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची मंगळवारी पुण्यात बैठक झाली. पण बैठकीत लावण्यात आलेल्या पोस्टरवर पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचे नेते व विधान परिषदेचे गटनेते असूनही आमदार सतेज पाटील यांचा फोटो नव्हता. यावरून कोल्हापुरातून या बैठकीला गेलेल्या कार्यकर्त्यांनी नेत्यांना धारेवर धरले. त्यामुळे बैठकीत काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, इतर नेत्यांनी सारवासारव करून त्यावर पडदा टाकला.

लोकसभेच्या (Lok Sabha) पार्श्‍वभूमीवर काँग्रेसकडून विभागनिहाय मेळावे आयोजित केले आहेत. काल पश्‍चिम महाराष्ट्राचा मेळावा होता. त्यासाठी कोल्हापुरातून (Kolhapur) आमदार प्रा. जयंत आसगांवकर, जयश्री जाधव, ऋतुराज पाटील, राजू आवळे यांच्यासह शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शशांक बावचकर, तौफिक मुल्लाणी, सूर्यकांत पाटील, संजय पोवार उपस्थित होते.

बैठकीसाठी लावण्यात आलेल्या पोस्टरवर प्रमुख नेत्यांसह इतर नेत्यांचे फोटो होते. त्यावर सतेज पाटलांचा (Satej Patil) फोटो न दिसल्याने उपस्थित पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. कोल्हापूर मतदारसंघाचा आढावा असूनही त्यांचा फोटो नसल्याने पदाधिकारी संतापले होते. त्यांनी इतर नेत्यांकडे आपला संताप व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, कोल्हापूरसह सांगली व सोलापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे (Congress) घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाविकास आघाडी म्हणून तसा दावा करू, पण ऐनवेळी कुठल्याही पक्षाला उमेदवारी मिळाली तर त्यांच्या विजयासाठी सहकार्य करा, असे आवाहन पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी केरळचे आमदार रमेश चेन्नीथल्ला यांनी बैठकीत केले.

‘काँग्रेस कोल्हापूरसह सांगली, सोलापूर मतदारसंघांसाठी आग्रही आहे. कोल्हापूरची जागा काँग्रेसला मिळाली तर आमदार सतेज पाटील यांनाच उमेदवारी देऊ’, असे पटोले म्हणाले. ‘त्यावर तुम्ही कोल्हापुरातून लढला तरी आम्ही तुम्हाला विजयी करू’, असे आश्‍वासन सचिन चव्हाण यांनी दिले.

(Edited By - Rajanand More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT