Uddhav Thackeray, Sharad Pawar, Nana Patole Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : कोल्हापूरच्या जागेचा तिढा दिल्लीतून सुटला; ही जागा काँग्रेसकडे घेत शाहू महाराज निश्चित ?

Mahavikas Aghadi : राज्यातील तीन ते चार जागांबाबत महाविकास आघाडीमध्ये तिढा कायम होता. अखेर कोल्हापूरच्या जागेबाबत दिल्लीतून मार्ग निघाल्याची माहिती समोर येत आहे.

Rahul Gadkar

Kolhapur Political News :

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा तिढा अखेर सुटला आहे. राज्यातील तीन ते चार जागांबाबत महाविकास आघाडीमध्ये तिढा कायम होता. अखेर कोल्हापूरच्या जागेबाबत दिल्लीतून मार्ग निघाल्याची माहिती समोर येत आहे.

महाविकास आघाडीमध्ये या जागेसाठी ठाकरे गटानेदेखील प्रबळ दावा केला होता. त्यासोबत या जागेवर काँग्रेसचाही दावा ठाम होता. अखेर दिल्लीतील पक्ष नेतृत्वासोबत महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची चर्चा झाल्यानंतर कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडण्यावर एकमत झाल्याचे कळते. त्या बदल्यात ठाकरे गटाने सांगली लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे घेण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. (Marathi News)

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला जवळजवळ निश्चित झाला आहे. औपचारिक घोषणा बाकी आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराज हे काँग्रेसच्या तिकिटावर महाविकास आघाडीचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, जागेच्या बदल्यात काँग्रेसकडून शिवसेना ठाकरे गटाला सांगली लोकसभेची जागा दिली जाणार असल्याचे समजते. मात्र, काँग्रेसने (Congress) ही जागा सोडण्यास नकार दिल्याचे समजते. त्या बदल्यात रामटेक या जागेवरही शिवसेनेने दावा केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दोन्ही जागांबाबतच्या निर्णयावर बुधवारी महाविकास अघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांच्या बैठकीत शिक्कामोर्तब केले जाणार आहे. कोल्हापुरातून महाविकास आघाडीने शाहू महाराज यांच्या नावाला पसंती दिली आहे. कोल्हापूरच्या विद्यमान खासदारांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाने या जागेवर ठाम दावा केला होता. मात्र, 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला.

असा दावा काँग्रेसच्या नेतृत्वातील काहीजणांनी केला. तरी ठाकरे यांच्या शिवसेनेने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर आपलाच हक्क असल्याचे ठासून सांगितले आहे. कोल्हापूरची जागा काँग्रेसला सोडण्याच्या बदल्यात सांगलीची जागा शिवसेनेला द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ती नेत्यांनी मान्य केल्याचे समजते. त्यावर बुधवारच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

नुकतेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) हे कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी राज्यातील तीन ते चार जागांवर तिढा कायम असल्याचे सांगितले होते. या जागेंबाबत दिल्लीतील पक्ष नेतृत्वाशी चर्चा करून निर्णय घेतला पाहिजे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले होते. कोल्हापूरचे माजी पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनीदेखील दोन दिवसांपूर्वी दिल्लीतील पक्ष नेतृत्वांशी बैठक घेऊन या जागेबाबत आपली भूमिका ठाम दर्शवली होती.

(Edited By-Ganesh Thombare)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT