Dhairyashil Mane News : मानेंच्या बॅनरवर विकासकामांची माहिती देण्यासाठी 'क्यू आर कोड', पण उघडली भलतीच वेबसाइट

Dhairyashil Mane Banner Hatkangale Lok Sabha : खासदार धैर्यशील मानेंनी मतदारसंघात अनेक ठिकाणी निधी खेचून आणल्याचे बॅनर लावले आहेत.
Dhairyashil Mane Banner
Dhairyashil Mane BannerSarkarnama
Published on
Updated on

Political News : लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाव्य उमेदवारांकडून विकासकामांबद्दल मतदारसंघात प्रचार सुरू आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदार धैर्यशील माने (Dhairyashil Mane) यांनी केलेल्या विकासकामांची माहिती देणारे बॅनर लावले आहेत. बॅनरवर विकासकामं आणि निधीची माहिती जाणून घेण्यासाठी क्यू आर कोड देण्यात आला आहे. तो फेक असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

मतदारसंघातील काही तरुणांनी बॅनरवर लावलेला क्यू आर कोड स्कॅन केला. मात्र, त्यानंतर वेगळंच संकेतस्थळ उघडत असल्याचं निदर्शनास आलं आहे. यानंतर धैर्यशील मानेंना ( Dhairyashil Mane ) सोशल मीडियात ट्रोल केलं जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आगामी लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तशी इच्छुक आणि विद्यमान खासदारांनी लोकसभा मतदारसंघात आणलेल्या निधींचे बॅनर झळकवण्यास सुरुवात केली आहे. खासदार धैर्यशील मानेंनी मतदारसंघात अनेक ठिकाणी निधी खेचून आणल्याचे बॅनर लावले आहेत.

हातकणंगले मतदारसंघासाठी जवळपास 8 हजार 200 कोटी रुपयांचा निधी केंद्र आणि राज्य सरकारकडून आणला असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्याबद्दल खासदार मानेंच्या अभिनंदनाचे फलक कार्यकर्त्यांनी लावले आहेत.

अशातच मतदारसंघातील विकासकामांची माहिती देण्यासाठी बॅनरवर क्यू आर कोड लावण्यात आला आहे. पण, हा क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर बिटकॉइन आणि शेअर मार्केटचे संकेतस्थळ ओपन होत आहेत. एकीकडे सायबर क्राइमसारख्या घटनांनी अनेकांची बँक अकाउंट रिकामी झाली आहेत.

त्यातच असा क्यू आर कोड स्कॅन केल्यामुळे अकाउंट रिकामं होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बॅनरवर लावलेल्या क्यू आर कोडमुळे अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. तसेच, हा प्रकार समोर आल्यानंतर सोशल मीडियावर धैर्यशील मानेंना ट्रोलही करण्यात येत आहे.

( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com