Sharad Pawar, Amol Kolhe, Dilip Walse Patil, Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : अजितदादांच्या आव्हानाला शरद पवार दाखवणार अस्मान? वळसेंच्या होमपिचवर कोल्हेंसाठी फिल्डिंग

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची 21 फेब्रुवारीला शिरूर लोकसभा मतदारसंघात सभा. दिलीप वळसे पाटलांच्या होमपिचवर ही तिसरी सभा.

Rajanand More

Shirur News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना आव्हान दिले आहे. आपण दिलेला उमेदवारच विजयी होणार, असे आव्हान त्यांनी दिले आहे. या आव्हानाला अस्मान दाखवण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले आहेत. येत्या 21 फेब्रुवारीला ते या मतदारसंघात सभा घेणार आहेत. (Lok Sabha Election 2024)

शरद पवारांची (Sharad Pawar) शिरुर लोकसभा मतदार संघात 21 फेब्रुवारीला तिसरी सभा होत आहे. ही सभा सहकारमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या (Dilip Walse Patil) होमपिचवर होत असल्याने या सभेबाबत उत्सुकता वाढली आहे. ठरलं.. तोफ धडाडणार.. मी येतोय ...! ही टँगलाईन देऊन शिरुर-आंबेगाव मतदारसंघात येत असल्याचा संदेश सभेच्या आधी देण्यात आला आहे. कोल्हेंनाच शरद पवारांकडून ताकद दिली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शरद पवारांनी खासदार कोल्हेंसाठी (Amol Kolhe) चांगलीच फिल्डिंग लावल्याचे दिसते. या लोकसभा मतदारसंघात अशोक पवार (Ashok Pawar) हे एकमेव आमदार त्यांच्यासोबत आहेत. पण असे असले तरी शरद पवारांनी बांधणी केलेल्या या मतदारसंघात अजूनही त्यांची ताकद आहे. विद्यमान आमदारांकडून ते मान्य केले जाते. असे असताना अजित पवारांनी कोल्हेंना खुले आव्हान दिले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अजितदादांच्या (Ajit Pawar) आव्हानानंतर आता शरद पवार त्याला असे उत्तर देणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात होते. पण तेही अजित पवारांसोबत गेले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या काही बैठकांमध्ये दोघे एकत्र आले होते. पण तेवढ्यापुरतेच. आता शरद पवार थेट त्यांच्या मतदारसंघातून रणशिंग फुंकणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT