Congress Pune News :
आगामी निवडणुका जिंकण्याच्या दृष्टिकोनातून विविध पक्ष आणि पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांकडून व्युव्हरचना आखण्यात येत आहेत. पुण्यामधून काँग्रेसकडून 2019 ची लोकसभा निवडणूक लढलेले आणि यंदाही लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या माजी आमदार मोहन जोशी यांनी नागरी समस्यांच्या मुद्द्यावरून भाजपला घेरण्याची तयारी सुरू केली आहे.
पुणेकरांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या नागरी समस्यांवर उत्तरे पुणेकरांकडूनच घेऊन ती संबंधित खात्याकडे मांडून त्यावर उपाययोजना करण्यासाठी '#वेकअप Pune कर' ही लोकचळवळ सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहे.
'गेल्या दहा वर्षांत पुण्याचा विस्तार झाला, लोकसंख्या वाढली. त्याबरोबर ट्रॅफिक, पाणीपुरवठा, आरोग्य, स्वच्छता, हवेचे प्रदुषण याबाबतचे प्रश्नही निर्माण झाले. या प्रश्नांवर उपाययोजना काय असाव्यात? याची उत्तरे पुणेकरांकडूनच घ्यावीत, त्यातून पुणेकरांमध्ये जागृती निर्माण होईल, जनमताचा रेटा निर्माण झाला की समस्या नेमकेपणाने सोडविणे अधिक सोपे जाईल. अशा उद्देशाने '#वेकअप पुणेकर' ही लोकचळवळ उभी करीत आहोत. यात स्वयंसेवी संस्था, जागरूक नागरिक, विविध विषयांचे तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते सहभागी असतील', अशी माहिती माजी आमदार मोहन जोशी (Pune Congress ) यांनी दिली.
पुणेकरांना भेडसावणारा ट्रॅफिक हा विषय प्राधान्याने हाती घेत आहोत. पुण्यात दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या वाढते आहे. शाळा, कॉलेजेस, ऑफिसेस, रूग्णालये येथे जाण्यासाठी वाहनांचा वापर अनिवार्य झालेला आहे. पार्किंगची समस्या वाढते आहे. पार्किंगच्या मुद्द्यावरून वादावादीचे प्रसंग उद्भवतात. दूर अंतरावर जाण्यासाठी वाहनचालकांना मनःस्ताप सहन करावा लागतो. या कारणांनी ट्रॅफिक या मुद्द्याला महत्त्व देण्यात आल्याचे ते जोशी यांनी सांगितले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शहराच्या सर्व भागातील वाहतुकीची कोंडी होणारी ठिकाणे, ट्रॅफिक सिग्नल्स या ठिकाणी '#वेकअप पुणेकर'चे स्वयंसेवक थांबतील आणि वाहनचालकांकडून प्रश्नावलीचा फॉर्म भरून घेतील. या प्रश्नावलीत समस्येवरील उत्तरेही अपेक्षित केलेली आहेत. 15 दिवसांनंतर या फॉर्मच्या आधारे माहिती संकलित केली जाईल. पुणेकरांनी सुचविलेल्या उपाययोजनांची छाननी करून ती राबविण्यासाठी 'वेकअप' पुणेकर मार्फत कसोशीने प्रयत्न करण्यात येतील. वाहतुकीच्या कोंडीत '#अडकलाय पुणेकर', '#वेकअप पुणेकर' अशी घोषवाक्य लिहिलेले फलकही पूर्ण शहरात लावण्यात येतील, असे ते म्हणाले.
पुणेकरांनी सुचविलेल्या उपाययोजना आणि समस्यांसाठी सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्मही वापरण्यात येईल. असे मोहन जोशी यांनी सांगितले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस एक प्रकारे सोशल मीडियाच्या माध्यामातून आणि लोकांमध्ये जाऊन पुणेकरांच्या समस्यांबाबत अवेरनेस करून भाजप विरोधात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे.
edited by sachin fulpagare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.