Satara NCP News : महाराष्ट्रात मागील वेळी विरोधी पक्षाला लोकसभेच्या सहा जागा मिळाल्या होत्या. आता यावेळेस लोकांना बदल पाहिजे आहे. त्यामुळे आम्हा सर्वांना मिळून 30 ते 35 जागा मिळण्याची शक्यता आहे. लोक काँग्रेस, राष्ट्रवादीचा विचाराबरोबरच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील संघटनेला समर्थन देत आहेत, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar News) यांनी साताऱ्यात व्यक्त केले.
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त शरद पवार गुरूवारी साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी सातारा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) भवनात पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) चित्र काय असेल यावर पवार म्हणाले, मागील निवडणुकीत काँग्रेसला एक, राष्ट्रवादीला चार जागा तर शिवसेनेला एक अशा विरोधी पक्षाला सहा जागा मिळाल्या होत्या. (Latest Political News)
आम्हाला लोकांचा पाठिंबा मिळत असल्याने यावेळी आमची संख्या 30 ते 35 खासदारांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. कारण लोकांना बदल पाहिजे आहे. लोक काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादीचा विचाराबरोबरच उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाखाली काम करणाऱ्या संघटनेला समर्थन देत आहेत, असे पवार म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शिवाजी पार्क मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) व राज ठाकरे एकत्र येत आहेत, यावर शरद पवार म्हणाले, बघुया काय होतंय ते. मोदींना कोणा-कोणाची मदत हवी आहे, हे यातून दिसते. त्यांचा आत्मविश्वास कुठं गेलाय, हेही समजत असल्याचा टोला पवारांनी लगावला.
दुसऱ्याच्या पक्षात तोंड कशाला घालता....
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार स्वत:च सर्व निर्णय घेतात. पण ते इतर सहकाऱ्यांना सांगतात पक्षाने निर्णय घेतल्याचे दाखवतात, अशी टीका अजित पवारांनी केली होती. यावर शरद पवार म्हणाले, त्यांनी त्यांचा पक्ष नीट चालवावा. दुसऱ्याच्या पक्षात कशाला तोंड घालता, असा फटकारा त्यांनी लगावला.
कार्यकर्त्यांना वाटत असेल तर आनंद आहे...
सुप्रिया सुळे यांचे पुण्यात फटाक्याच्या आतषबाजीत व पेढे वाटून कार्यकर्त्यांनी स्वागत केले. यातून त्यांच्या विजयाचा आत्मविश्वास वाढला आहे का, या प्रश्नावर पवार यांनी असा काही संबंध नसल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांना तसे वाटत असेल तर आनंद आहे, असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, सातारा व बारामती लोकसभेच्या निकालाबाबत भाष्य करणे शरद पवारांनी टाळले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.