Dindori Constituency : पवार घराण्यातील जावा तपानंतर भेटल्या, गळ्यात पडल्या अन् गहिवरल्या

Dr. Bharati Pawar News : मतभेदाचा या दोघांच्याही राजकीय कारकीर्दीवर देखील परिणाम झालेला आहे. व्यक्तिगत मतभेदांमुळे हे कुटुंब प्रदीर्घ काळापासून एकत्र आलेले नव्हते. त्यामुळे त्यांच्यातील हा राजकीयवाद चर्चेचा विषय होता.
Bharati Pawar
Bharati PawarSarkarnama

Dr. Bharti Pawar Political News : दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ भारती पवार यांनी आज त्यांचे दीर आमदार नितीन पवार यांच्याशी असलेले वैर संपविले. राजकारणाकरीता त्यांनी हा महत्त्वाचा भावनिक निर्णय घेतला. एक तपानंतर एकत्र आलेल्या या कुटुंबाने भेट घेत भावनिक झाल्या.

कळवणच्या राजकारणात ए. टी. पवार कुटुंबाचे राजकीय वर्चस्व गेली चार दशके कायम आहे. भारती पवार यांच्या जाऊबाई आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांच्याशी त्यांचे गेली अनेक वर्ष राजकीय आणि कौटुंबिक मतभेद आहेत.

या मतभेदाचा या दोघांच्याही राजकीय कारकीर्दीवर देखील परिणाम झालेला आहे. व्यक्तिगत मतभेदांमुळे हे कुटुंब प्रदीर्घ काळापासून एकत्र आलेले नव्हते. त्यामुळे त्यांच्यातील हा राजकीयवाद चर्चेचा विषय होता.

Bharati Pawar
Ajit Pawar News : 'रोहितचा बॅलन्स बिघडलाय, काहीही बडबडतोय'; अजितदादांचा पुतण्यावर वार!

नितीन पवार (Nitin Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे कळवण मतदार संघाचे आमदार आहेत. हा मतदारसंघ भाजपच्या डॉक्टर भारती पवार उमेदवार असलेल्या दिंडोरी लोकसभा (Dindori Loksabha) मतदारसंघाचा भाग आहे.

हे दोघेही महायुतीचे सदस्य आहेत. त्यामुळे एकत्र येऊन एकमेकांसाठी प्रचार करणे आज घडीची गरज होती. मात्र या दोन्ही कुटुंबात मतभेद असल्याने प्रचारासाठी एकत्र कसे यावे हा मोठा गुंता होता.

त्यावर राज्यमंत्री पवार यांनी पुढाकार घेत आज त्यांच्या सासूबाई शकुंतला पवार आणि पती प्रवीण यांच्यासह नितीन पवार यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी डॉक्टर पवार आणि त्यांच्या जाऊ बाई जयश्री पवार या दोघीही भावुक झाल्या होत्या.

प्रदीर्घ काळानंतर एकत्र आल्याने त्यांनी गळाभेट घेत अश्रूंना वाट करून दिली. दोघींना भरून आलं. यावेळी नितीन पवार यांच्या मातोश्री आणि भारती पवार यांच्या सासू शकुंतला पवार यांचा देखील कंठ दाटून आला होता.

दरम्यान डॉ भारती पवार यांनी आज घेतलेल्या या निर्णयाने कळवण विधानसभा मतदारसंघातील राजकीय चित्र बदलणार आहे. आमदार नितीन पवार आणि भारती पवार दोघांचाही मूळ मतदार संघ कळवण आहे.

हे दोघेही परस्पर विरोधक एकत्र आल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांच्या विरोधात त्यांना प्रचारात आघाडी घेता येऊ शकतील. कळवण सुरगाणा मतदारसंघातील माकपचे माजी आमदार जे. पी. गावित (J P Gavit ) यांनी आपली अपक्ष उमेदवारी मागे घेतली आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जाते.

याबाबत आमदार पवार म्हणाले 'आमच्यामध्ये कुठलाही राजकीय वाद नव्हता कौटुंबिक विसंवाद होता. माझ्या मुलाच्या लग्नाला सबंध कुटुंब हजर होते. तेव्हापासूनच हा वाद संपण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. आज हा वाद पूर्णपणे संपला आहे. त्यामुळे आम्ही निवडणुकीत एकत्र येऊन प्रचाराचे नियोजन करणार आहोत.

या भेटीबाबत राज्यमंत्री डॉक्टर पवार यांनीही आपलं मन मोकळे केले. आमच्यात कोणताही मतभेद किंवा वितुष्ट नव्हते. दुरावा होता. तो आता संपला आहे. भाजपचा यंदा 400 पार हा नारा आहे. त्या अनुषंगाने आज आमचे भेट झाली. येत्या निवडणुकीमध्ये पवार कुटुंब एकत्र आल्याने मतदार संघातील राजकीय वातावरण बदलण्यास मदत होईल,'असे त्या म्हणाल्या.

Bharati Pawar
Ajit Pawar News : 'मी उद्धव ठाकरेंना जवळून ओळखतो, ते असं काही करणार नाहीत'; अजितदादा स्पष्टच बोलले!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com