Purushottam Jadhav, Ajit Pawar
Purushottam Jadhav, Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : शिदेंचा शिलेदार अजितदादांच्या भेटीला; साताऱ्यात वारं फिरणार?

उमेश भांबरे

Satara Political News : सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. शिंदे गट शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीत त्यांनी आपण सातारा लोकसभेसाठी इच्छुक असून आजपर्यंत माझ्यावर अन्याय झालेला आहे. त्यामुळे यावेळेस महायुतीतून आपल्याला संधी मिळावी, अशी आग्रही मागणी त्यांनी अजित पवारांकडे केली. याभेटीमुळे राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील इच्छुकांच्या भुवया उंचावल्या आहेत. Lok Sabha Election 2024

सातारा लोकसभेचा तिढा दिवसेंदिवस वाढतच आहे. साताऱ्यासाठी खासदार उदयनराजे भोसले (Udaynraje Bhosale) व त्यांचे आक्रमक झालेल्या समर्थकांना समजविण्यासाठी मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांची साताऱ्यात येऊन भेट घेतली. तसेच त्यांच्याशी चर्चाही केली. हे सर्व सुरु असतानाच शिंदे गट शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी आज मुंबईत जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

दोघांमध्ये सातारा लोकसभेबाबत सुमारे तासभर चर्चा झाली. या चर्चेत पुरुषोत्तम जाधव (Purushottam Jadhav) यांनी महायुतीत शिवसेनेच्या वतीने सातारा लोकसभा लढण्यास मी इच्छुक आहे. ही जागा मुळच्या जागा वाटपानुसार शिवसेनेची आहे. यापूर्वी दोन वेळी ही निवडणूक लढलो असून यामध्ये अडीच लाखांवर मते घेतली आहेत. त्यामुळे यावेळेस मला संधी मिळावी. यासाठी आपण महायुतीतून मला संधी मिळण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी अजितदादांकडे केली.

यावर अजितदादांनी (Ajit Pawar) त्यांना महायुतीचे जागा वाटप अद्याप पूर्ण झालेले नाही. काही जागांवर एकमत होत नाही. सातारची जागांवर आम्ही आग्रही आहोत. तसेच भाजप आणि तुमची शिवसेनाही जागा मागत आहे. त्यामुळे यात समझोता झाल्यावर आपण निश्चित यावर विचार करु असे त्यांनी जाधव यांना सांगितले. पुरुषोत्तम जाधव यांच्या या भेटीमुळे राष्ट्रवादीतील इच्छुकांच्या मात्र, भुवया उंचावल्या आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT