Ahmednagar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात समील होत असल्याच्या चर्चा आहेत. शरद पवार यांची आमदार लंकेंनी देखील भेट घेतली. या भेटीवर भाजप पदाधिकाऱ्याने मोठा गौप्यस्फोट केला आहे. मोठ्या पवारांनी (शरद पवार) आमदार लंकेंना जवळ घेताच नगर जिल्ह्यातील छोटे पवार नाराज झाले आहेत, असा दावा भाजपचे प्रदेश चिटणीस अरुण मुंडे यांनी केल आहे.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची पूर्वतयारी आढावा बैठक झाली. या बैठकीला भाजपचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, आमदार प्रा. राम शिंदे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार मोनिका राजळे, खासदार सुजय विखे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, अभय आगरकर, महेंद्र गंधे, अरुण मुंडे, दिलीप भालसिंग उपस्थित होते.
महायुतीतील भाजपने विद्यमान खासदार सुजय विखे (Sujay Vikhe Patil) यांना उमेदवार जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीकडून ही जागा शरद पवार गटाकडे आहे. मात्र शरद पवार गटाकडून उमेदवार जाहीर झालेला नाही. शरद पवार गटाकडून अजून चाचपणी सुरू असल्याचा दावा केला जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) हे शरद पवार यांच्या संपर्कात आहेत.
शरद पवार यांची दोन दिवसांपूर्वीच आमदार लंके यांनी भेट घेतली. यावरून आमदार लंके हे अजित पवार यांची साथ सोडणार असल्याची चर्चा रंगली आहे. शरद पवार आणि आमदार लंके हे एकत्र असले, तरी अधिकृत अशी उमेदवारीचा घोषणा झालेली नाही.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आमदार लंकेंच्या उमेदवारीबाबत महायुतीच्या भाजपच्या आखाड्यात आडाखे बांधले जात आहे. आमदार लंके हेच महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नगर दक्षिणमधून उमेदवार आहेत, ते दुरून खडे मारून पाहात आहेत. यातच भाजपचे प्रदेश चिटणीस अरुण मुंडे यांनी आमदार लंकेंनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेटीवर मोठा गौप्यस्फोट केला आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.