Rohit Patil On Narendra Modi Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rohit Patil News : "मोदींनी कोल्हापुरात भडकाऊ भाषण करत...", रोहित पाटलांची टीका

Rohit Patil On Narendra Modi : "मोदी यांचा विरोध राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांना आहे," असा आरोपही रोहित पाटलांनी केला.

Akshay Sabale

Kolhapur Political News : जनतेचा शाहू महाराज यांच्या विचारांवर विश्वास आहे. आता असलेल्या सरकारबद्दल चीड आम्हाला महाराष्ट्रात दिसत आहे. यंदा तरुणवर्ग कोणत्याही भावनेच्या भरात न जाता बेरोजगारीच्या विरोधात मतदान करेल. महाविकास आघाडीला ( Mahavikas Aghadi) चांगल्या जागा मिळतील आणि देशात एक चांगला संदेश जाईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पाटील यांनी व्यक्त केला.

कोल्हापुरात काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती ( Shahu Maharaj Chhatrapati ) यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची सभा पार पडली. या वेळी माजी मंत्री, आमदार सतेज पाटील ( Satej Patil ), आमदार आदित्य ठाकरे ( Aaditya Thackeray ), आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ), माजी आमदार मालोजीराजे छत्रपती ( Malojiraje Chhatrapati ) उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

रोहित पाटील म्हणाले, "शाहू छत्रपती यांच्या गादीला विरोध करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोल्हापुरात यावं लागतं. हा विराेध राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांना आहे. नरेंद्र मोदी यांनी कोल्हापुरात भडकाऊ भाषण केलं. तरुणांची माथी कशी भडकतील याची दक्षता घेण्याचा प्रयत्न मोदी यांनी केला."

सांगलीतील महाविकास आघाडीच्या वादावरही रोहित पाटील यांनी भाष्य केलं आहे. रोहित पाटील यांनी म्हटलं, "सांगलीच्या वादासाठी जयंत पाटील जबाबदार असतील, असं मला वाटत नाही. घरातील नवरा-बायकोची भांडणं बोलल्यानंतर मिटतात, असं मी ऐकलं आहे. मात्र, माझं अजून लग्न झालं नाही. सांगलीबद्दल झालेले गैरसमज लवकरच दूर होतील. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य कसं मिळेल, यासाठी प्रयत्न करतोय."

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT