Aaditya Thackeray News : 'देशातील जनता इंडिया आघाडीसोबत; ही शक्ती चार जूनला दिसेल...'

Lok Sabha Political Update : शिवसेना एकच ती म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिंदेंची शिवसेना नाही तर तो गट आहे, अशी टीका करत ज्यांना मंत्रिपदं दिली, सत्तेत बसवले त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर केला.
Aaditya Thackeray News
Aaditya Thackeray News Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या नांदेड येथील महायुतीच्या सभेत इंडिया आघाडीवर टीका केली होती. काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे India Alliance लोक एकमेकांचे कपडे फाडतील, या आघाडीला व काँग्रेसला देशातील 25 टक्के मतदारसंघात उमेदवाराच सापडले नाहीत, असा हल्ला मोदींनी चढवला होता. यावर संभाजीनगर येथे चिकलठाणा विमानतळावर आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिले. Marathawada Latest Politics

देशातील जनशक्ती इंडिया आघाडीबरोबर आहे, येत्या चार जूनला ही शक्ती तुम्हाला दिसेल, असा टोला ठाकरे यांनी पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना लगावला. शिवसेना एकच ती म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे Uddhav Thackeray, शिंदेंची शिवसेना Shivsena नाही तर तो गट आहे, अशी टीका करत ज्यांना मंत्रिपद दिली, सत्तेत बसवले त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर केला.

आदित्य ठाकरे Aaditya Thackeray यांना मुख्यमंत्री पदासाठी तयार करतो या उद्धव ठाकरे यांच्या दाव्यासह राज्यातील विविध विषयावर विचारलेल्य प्रश्नांना आदित्य ठाकरे यांनी उत्तरे दिली. महायुतीतल्या शिंदे गटाची अवस्था वाईट झाली आहे. एकेका जागेसाठी शिंदे गटाला भाजपची मनधरणी करावी लागत आहे. जाहीर झालेले उमेदवार बदलावे लागत आहेत. ज्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे त्यापैकी भाजपा BJP त्यांना किती जागा लढू देईल, हे सांगता येत नाही.

Aaditya Thackeray News
Lok Sabha Election 2024 : शिंदेंनी नाकारताच विनोद पाटील फडणवीसांच्या दरबारी

मुख्यमंत्री पद मिळावे म्हणून उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी शरद पवारांकडे माणसं पाठवली होती, या विरोधकांच्या आरोपावर आदित्य ठाकरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. शिंदे यांचे सरकार निर्लज्ज आणि नीच प्रवृत्तीचे आहे. शिंदे यांच्यासारखा नीच व्यक्ती आपण पाहिलेला नाही. ज्यांनी त्यांना घडवले त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून सगळे उद्योग त्यांनी गुजरातला पळवले.

शिवसेनेने गद्दारांना सर्व काही दिले, राजकीय ओळख, मंत्री पद दिले. पण उद्धव ठाकरेंच्या कठीण काळात शिंदेंनी पाठीत खंजीर खुपसला, त्यांच्यासारखा नीच व्यक्ती मी पाहिला नाही, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप केला. आम्ही आमच्या प्रचार गीतातून जय भवानी काढणार नाही, इलेक्शन कमिशनमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी भाजपवर कारवाई करावी. इलेक्शन कमिशन भाजपसोबत मिळालेलं आहे हे पुन्हा एकदा दिसले.

जय भवानी, जय शिवाजी काढणे म्हणजे त्यांच्यात असलेला महाराष्ट्रद्वेष दिसून येतोय, अशी टीका निवडणूक आयोगाच्या कारवाईवरून आदित्य ठाकरेंनी केली. आमच्या मिरवणुकीत प्रचारात जय भवानी जय शिवाजी वाजणारच, ते आमचे ब्रीदवाक्य आहे, असेही ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

आदित्य ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदावरच्या चर्चेवर बावनकुळे यांनी केलेल्या टीकेकडे लक्ष वेधले तेव्हा बावनकुळे यांनी मकाऊचे मुख्यमंत्री बनू शकतात का? हा प्रश्न विचारावा, असा टोला त्यांना लगावला. जेलमध्ये टाकतील म्हणून घाबरून गुजरातला पळून गेले अशा व्यक्तीकडून किती ऐकायचं हे महाराष्ट्राच्या लोकांनी ठरवलं आहे. महाराष्ट्र त्यांचा ऐकणार नाही, त्यांना बिलकुल भाव मिळणार नाही, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

R

Aaditya Thackeray News
Ambadas Danve News: महाराष्ट्र उलट चिडून मतदान करेल..जय भवानी! जय शिवराय!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com