Chandrahar Patil, Vishal Patil, Sanjay Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : संजयकाकांच्या दिलदार मित्राने चंद्रहार पाटलांचा बळी दिला!

Sangli Lok Sabha Constituency : सांगलीमध्ये काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे तिरंगी लढत झाली. महायुतीचे संजय पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील तर अपक्ष विशाल पाटील असा हा सामना होत आहे.

Rahul Gadkar

सांगली: राहुल गडकर

Sangli News : सांगली लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) मतदान पार पडल्यानंतरही तीन पाटलांच्यात कोण बाजी मारणार यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. निवडणुकीचा निकाल 4 जूनला असला तरी सांगली लोकसभेतील पारंपारिक विरोधक अजूनही एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहेत. महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा खेळ मतदानानंतरही सुरू आहे. सांगली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत संजय काका पाटील यांनी कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू कामाला आला, असे विधान केल्यानंतर अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे.

सांगलीत संजयकाका (Sanjay Patil) आणि विशाल पाटलांच्या मध्ये दिलदार मित्र आणि दिलदार शत्रू वरून वाकयुद्ध सुरू झाले आहे. दोघांकडूनही आपणच विजयी होण्याचा दावा केला जात आहे. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आणि निकालाची उत्सुकता असताना या दोन नेत्यांच्या एकमेकांवरील आरोपाच्या सत्रामुळे सांगलीचे वातावरण अजूनही तापलेलं दिसून येत आहे. (Latest Political News)

कपटी मित्रापेशा दिलदार शत्रू कामाला आला असे म्हणत आपल्याला सांगली जिल्ह्यातील काही नेत्यांनी मदत केल्याचं एक प्रकारे संजयकाकानी बोलताना मान्य केले होते. यावर बोलताना विशाल पाटील (Vishal Patil) यांनी काही लोकांकडून आम्ही या निवडणुकीत कुठलीही अपेक्षा ठेवलेली नाही, असे सुचक विधान केले. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आम्ही विरोधकाकडून अपेक्षा ठेवत नाही, कारण माझा दोस्तच दिलदार आहे, त्यामुळे मला शत्रूकडे बघायला लागत नाही. शत्रूकडून अपेक्षा ठेवावी लागत नाही. माझे दिलदार मित्र हे माझ्या मदतीला येणार होते. संजयकाका एवढे वैफल्यग्रस्त झालेले आहेत की ते आता काँग्रेसच्या (Congress) नेत्यांवर सुद्धा टीका करू लागलेले आहेत, असा टोला विशाल पाटील यांनी लगावला.

खासदारांच्या दिलदार मित्रानेच चंद्रहार पाटील यांचा बळी दिला, असा टोलाही विशाल पाटलांनी आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांचे नाव न घेता लगावला. संजयकाकांनी त्यांच्या दिलदार शत्रूसोबत बसून षड्‌यंत्र रचले. सांगलीत नुरा कुस्ती लावण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र तो फसला. त्यामुळे मावळते खासदार आता वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यातून त्यांचा राग, अहंकार बाहेर येत आहे, अशी जोरदार टीका विशाल पाटील यांनी केली.

काय बोलले होते संजयकाका पाटील?

सांगली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत संजयकाका पाटील यांनी, माझे नशीब उलटे सुलटे करण्याची अजून कुणाच्यात हिंमत नाही, माझे नशीब बदलणारा अजून राजकीय पुढारी जन्माला आला नाही, असे म्हटले होते. लाखापेक्षा जास्त मताधिक्य मला मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. आपल्याला जिल्ह्यातील काही नेत्यांनी गुप्तपणे मदत केलीय हे खरे आहे का? असा प्रश्न संजय काकांना विचारला असता कपटी मित्रापेशा दिलदार शत्रू कामाला आला, असे विधान त्यांनी केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT