Solapur Lok Sabha : सोलापुरात प्रणिती शिंदे की राम सातपुते जिंकणार?; राष्ट्रवादी-मनसेत लाखाची पैज

Lok Sabha Election 2024 : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे राम सातपुते लोकसभेत जाणार, अशी पैज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रशांत इंगळे यांनी चॅलेंज दिले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत बाबर यांनी इंगळे यांचे चॅलेंज स्वीकरले असून त्यांनी सोलापूरमधून प्रणिती शिंदेंच जिंकून येतील, असा दावा केला आहे.
Praniti Shinde-Ram Satpute
Praniti Shinde-Ram SatputeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 16 May : लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पूर्ण झाले असून पाचव्या टप्प्यासाठी येत्या वीस तारखेला मतदान होणार आहे. तत्पूर्वी मतदान झालेल्या ठिकाणी आमचाच उमेदवार जिंकणार, यावरून महायुती आणि महाविकास आघाडीच्या समर्थक नेत्यांमध्ये पैजा लागत आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे राम सातपुते लोकसभेत जाणार, अशी पैज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रशांत इंगळे यांनी चॅलेंज दिले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत बाबर यांनी इंगळे यांचे चॅलेंज स्वीकरले असून त्यांनी सोलापूरमधून प्रणिती शिंदेंच जिंकून येतील, असा दावा केला आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात (Solapur Lok Sabha Constituency) काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde), तर भाजपकडून आमदार राम सातपुते (Ram Satpute) हे एकमेकांसमोर उभे ठाकले होते. या दोन युवा आमदारांमध्ये तुल्यबळ लढत झाली आहे. आता त्यांच्या विजयाच्या पैजा महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये लागत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Praniti Shinde-Ram Satpute
Ajit Pawar 'Not Reachable' : अजित पवारांच्या ‘नॉट रिचेबल’चे कारण आले पुढे; राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण

मनसेचे प्रशांत इंगळे आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत बाबर यांच्यात ही पैज लागली आहे. भाजपाचे राम सातपुते हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून 70 ते 80 हजार मतांनी निवडून येतील, असा दावा मनसेचे इंगळे यांनी एक लाख रुपयांचा विडा उचलून पैज लावली आहे. जय श्रीराम म्हणत सोलापूरच्या हलगीचा आवाज संसदेत नाही पोचला तर नाव सांगणार नाही, असेही इंगळे यांनी म्हटले आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्याचा त्यांच्या अजेंड्यावर विश्वास असला तरी आमचाही नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांच्यावर विश्वास आहे. मी एक लाख रुपयाची पैज लावतो, असेल हिम्मत तर प्रशांत बाबर यांनी तो पैजेचा विडा उचलावा, असे आवाहन त्यांनी प्रशांत बाबर यांना दिले.

Praniti Shinde-Ram Satpute
Shirur Lok Sabha Vishelshan : आढळरावांच्या विजयाची भिस्त ‘आंबेगाव’वर; कोल्हेंना जुन्नर हात देणार का?

आमचा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर विश्वास आहे. त्याचबरोबर आमचा उमेदवार चांगला असल्यामुळे तो निवडून येईल, यात शंका नाही. त्यामुळे मी मनसेचे इंगळे यांनी दिलेले चॅलेंज स्वीकारत आहे, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रशांत बाबर यांनी मनसेचे इंगळे यांनी दिलेले आव्हान स्वीकारले.

Praniti Shinde-Ram Satpute
Chandrababu Naidu : देशात मोदी मूड, एनडीए 400+ जागा जिंकेल; अंबाबाईच्या दर्शनानंतर चंद्राबाबू नायडूंचा दावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com