Sanjaykaka Patil : लोकसभेत बेरंग करणार्‍या स्वकीयांचा हिशेब चुकता करणार; संजयकाकांचा कुणा-कुणाकडे रोख?

Sangli Lok Sabha Constituency : निवडणुकीत काहींनी शब्द दिला पण पाळला नाही. पक्षातीलच काहींनी विरोधात काम केले. ज्यांनी ज्यांनी रंग दाखवले, त्यांच्याशी जशास तसे वागण्याची भूमिका घ्यावी लागेल.
Sanjaykaka Patil
Sanjaykaka PatilSarkarnama

Sangli Political News : लोकसभा निवडणुकीत सापडतोय म्हटल्यावर माझ्यावर हत्यार काढण्याचा प्रयत्न झाला. काहींनी शब्द दिला पण पाळला नाही. पक्षातीलच काहींनी विरोधात काम केले. कोण कोणाला कोठे भेटले, कोणाशी चर्चा झाली, हे सर्व माहिती आहे. मात्र निवडणुकीत कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, वेळेला धावून आल्याचे उद्गार खासदार संजयकाका पाटील यांनी काढले. या निवडणुकीत बेरंग करणार्‍या सर्वांचा व्याजासह हिशेब चुकता करणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

खासदार पाटील Sanjaykaka Patil म्हणाले, निवडणुकीत काहींनी शब्द दिला पण पाळला नाही. पक्षातीलच काहींनी विरोधात काम केले. ज्यांनी ज्यांनी रंग दाखवले, त्यांच्याशी जशास तसे वागण्याची भूमिका घ्यावी लागेल. व्याजासह हिशेब चुकता केला जाईल. संजय पाटील यांच्यावर वार करणार्‍यांचा हिशेब चुकता होईल. इस्लामपूरहून तुम्हाला मदत झाल्याची चर्चा आहे, या प्रश्नावर संजय पाटील म्हणाले, कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, असेही ते म्हणाले.

सांगलीत Sangli Lok Sabha कोण निवडून येणार आहे, मी कोणत्या पाटलांच्या मागे उभा आहे, हे 4 जून रोजी कळेल असे वक्तव्य माजीमंत्री व आमदार असलेल्या एका राजकीय नेत्याने एका भाषणात केले आहे. पण माझं नशिब उलटंपालटं करणारा राजकीय पुढारी अजून पैदा व्हायचा आहे, असा हल्लाबोलही त्यांनी केला. महाविकास आघाडीच्या व्यासपीठावरून भाषण करणार्‍यांनी मतदानाच्या अगोदर गोपनीय बैठक घेऊन खिशातून 'पाकिट' काढून दाखवत मतदान कोणाला करायचे आहे, हे सांगितले.

Sanjaykaka Patil
Kalyan Kale News : 'मी थंड हवेच्या ठिकाणी नाही तर कार्यकर्त्यांमध्ये रमतो' ; कल्याण काळेंचा टोला!

मला घमेंड नाही. मस्तीही नाही. काही लोक हळवे असतात. काळजी करतात. त्यांनी अजिबात काळजी करू नये, मी तिसर्‍यांदा खासदार होणार आहे. काही जणांनी सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा विशेष परिणाम होणार नाही. थोडे मताधिक्य कमी होईल. एक लाखापेक्षा जास्त मताने माझा विजय निश्चित आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माजी जिल्हाध्यक्षांवर 4 जूननंतर बोलू

खासदार पाटील म्हणाले, विलासराव जगताप यांना बरेच दिवस समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी हेकेखोरपणा सोडला नाही. अजितराव घोरपडे यांची भूमिका काय असणार हे माहिती होते, त्यामुळे त्यांनाही भेटलो नाही. जगताप, घोरपडे तसेच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष यांनी काय केले. ते यापूर्वीच्या निवडणुकीतही काय करत होते, याबाबत 4 जूननंतर बोलू, असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील उपस्थित होते.

(Edited by Sunil Dhumal)

Sanjaykaka Patil
Sharad Pawar News : अजित पवार खरंच आजारी की नाराजी? शरद पवार म्हणाले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com