Dhairyasheel mane eknath shinde nivedita mane sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : धैर्यशील यांच्याऐवजी निवेदिता मानेंना उमेदवारी? अखेर शिंदे गटानं स्पष्टच सांगितलं

Rahul Gadkar

Hatkanangale News : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील ( Hatkanangale Lok Sabha Election 2024 ) महायुतीचा उमेदवार बदलण्याचा चर्चांना जोर धरला होता. धैर्यशील माने ( Dhairyasheel mane ) यांच्याऐवजी निवेदिता माने ( Nivedita Mane ) यांना उमेदवारी देण्याची चर्चा रंगली होती. मात्र, शिवसेना शिंदे गटाचे पक्ष निरीक्षक पांडुरंग पाटील यांनी महत्त्वाचा खुलासा करून हातकणंगलेच्या उमेदवारीच्या बदलाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. "धैर्यशील माने यांच्या उमेदवारीबाबत कोणताही संभ्रम नसावा. उमेदवारी बदलामध्ये कोणतेही तथ्य नाही," अशी माहिती पक्ष निरीक्षक पांडुरंग पाटील यांनी दिली आहे.

हातकणंगले शिवसेना पक्ष निवडणूक निरीक्षक पांडुरंग पाटील पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका मांडली. "मतदारसंघात फिरून मी अहवाल घेतला आहे. धैर्यशील मानेंच्या ( Dhairyasheel mane ) उमेदवारीबाबत कोणताही संभ्रम नसावा. युतीमध्ये जो उमेदवार दिला, त्याला निवडून आणण्यासाठी सर्वजण कटिबद्ध आहोत. उमेदवारी बदलाबाबत येणाऱ्या बातम्यात तथ्य नाही. धैर्यशील माने हेच युतीचे उमेदवार आहेत," असे स्पष्टीकरण पांडुरंग पाटील यांनी दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"जय शिरसाठ यांच्या विधानामुळे हा प्रकार घडला आहे. पण, अशी चर्चा झाल्यानंतर आमच्या मनात कोणताही संभ्रम नाही. कोणाच्याही मनात शंका, किंतु परंतु नाही. शिरसाठांशी चर्चा झाली आहे. मतदारसंघात फिरून आढावा घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली आहे. एकदा उमेदवारी घोषित झाल्यानंतर सर्वांना एकत्र काम करावे लागणार," अशी माहिती पांडुरंग पाटील यांनी दिली.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील ( Hatkanangale Lok Sabha Election 2024 ) महायुतीचे घटक पक्ष असलेले आमदार प्रकाश आवाडे ( Prakash Awade ) यांचे चिरंजीवदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यांनाही भेटून आपण चर्चा करणार असल्याचेही पांडुरंग पाटील यांनी सांगितले. शिवाय शिवसेना ठाकरे गटाचे काही नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करण्यास तयार आहेत, असे सूचक संकेतही पांडुरंग पाटील यांनी दिले.

( Edited By : Akshay Sabale )

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT