Hatkanangle Lok Sabha Constituency : धैर्यशील माने-राजू शेट्टी यांच्या लढतीत ‘वंचित’ची उडी; ठाकरे गटाचा सस्पेन्स कायम

Lok Sabha Election 2024 : हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदार धैर्यशील माने यांची लढत माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी होणार आहे. आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे स्वतंत्र रिंगणात उतरणार की, कोणाची उमेदवारी घेणार, याकडे लक्ष आहे. त्यातच बहुजन वंचित आघाडीने उमेदवार जाहीर केल्याने लढत आणखी तुल्यबळ होण्याची शक्यता आहे.
Dhairyasheel Mane-Prakash Ambedkar-Raju shetti
Dhairyasheel Mane-Prakash Ambedkar-Raju shettiSarkarnama

Kolhapur, 2 April : महायुतीकडून अखेर हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी खासदार धैर्यशील माने यांची उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांची लढत माजी खासदार राजू शेट्टी यांच्याशी होणार आहे. आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे स्वतंत्र रिंगणात उतरणार की, कोणाची उमेदवारी घेणार, याकडे लक्ष आहे. माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची भूमिका महत्त्‍वाची ठरणार आहे. त्यातच बहुजन वंचित आघाडीने उमेदवार जाहीर केल्याने लढत आणखी तुल्यबळ होण्याची शक्यता आहे.

माने यांच्यासमोर पुन्हा एकदा राजू शेट्टी (Raju shetti) यांच्यासारखा प्रबळ उमेदवार आहे. गेल्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतरही ते आंदोलनाच्या माध्यमातून सक्रिय राहिले आहेत. सध्या शेट्टी यांनी ‘एकला चलो रे’ ची भूमिका घेतली आहे. पण, ठाकरे गटाच्या शिवसेनेचा पाठिंबा मिळविण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) शेट्टी यांना अधिकृतपणे पाठिंबा दिल्यास महाराष्ट्रातील एक तुल्यबळ लढत पाहावयास मिळणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dhairyasheel Mane-Prakash Ambedkar-Raju shetti
Lok Sabha Election 2024 : शिवसेनेचे दोन उमेदवार बदलण्यासाठी भाजपचा मुख्यमंत्र्यांवर दबाव; शिंदे शब्द पाळणार की उमेदवार बदलणार?

दुसरीकडे, खासदार धैर्यशील माने यांच्यासमोर या वेळी कडवे आव्हान आहे. माने यांच्या पक्षाचा एकही आमदार मतदारसंघात नाही. भाजप आणि अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यावरच त्यांना अवलंबून राहावे लागणार आहे. मतदारसंघात केलेल्या विकासकामांचा त्यांना चांगला उपयोग होऊ शकतो. मतदारसंघातील भाजपची बांधणी व मोदी इफेक्टचा माने यांना कितपत फायदा होणार, हे पाहावे लागेल.

या मतदारसंघात जातीय समीकरणे महत्त्‍वाची ठरली आहेत. त्यामुळे राहुल आवाडे (Rahul Awade) यांची उमेदवारी असल्यास जैन समाजातील मतांची विभागणी होण्याचा मोठा धोका आहे. वंचित बहुजन आघाडीनेही जैन समाजाचा उमेदवार दिल्याने मत विभाजनाचा फटका आढळ आहे. इचलकरंजी, शिरोळ व हातकणंगले या तीन विधानसभा क्षेत्रांत आवाडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे आवाडे गटाची भूमिका महत्त्‍वाची असणार आहे. महायुतीकडे शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी मागितली होती. त्यांची भूमिकाही महत्त्‍वाची असणार आहे.

Dhairyasheel Mane-Prakash Ambedkar-Raju shetti
Dispute In Mahayuti : नाशिकमध्ये छगन भुजबळांची उमेदवारी निश्चित; खासदार हेमंत गोडसे बंडखोरीच्या तयारीत?

‘वंचित’ची ताकद कुणाच्या पथ्यावर?

हातकणंगले मतदारसंघात (Hatkanangle Constituency) वंचित बहुजन आघाडीची ताकद लक्षणीय आहे. गत निवडणुकीत त्याचा अनुभव आला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या इचलकरंजीत झालेल्या सभेला चांगला प्रतिसाद मिळाला होता. वंचितच्या उमेदवारीचा फायदा कोणाला होणार, याची चर्चा होत आहे.

‘महाविकास आघाडी’ने स्वतंत्र उमेदवार दिल्यास चुरस

महाविकास आघाडीने शेट्टी यांना पाठिंबा न देता स्वतंत्र उमेदवार दिल्यास लढत अधिक चुरशीची होऊ शकते. तूर्त तरी पहिल्या टप्प्यात आजी-माजी खासदार यांच्यातच पारंपरिक तुल्यबळ लढत होणार असल्याचे चित्र दिसत आहे.

R

Dhairyasheel Mane-Prakash Ambedkar-Raju shetti
Praniti Shinde Vs BJP : भाजपवाले आता माझं चारित्र्यहनन करतील; प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com