Lok Sabha Election 2024 : हातकणंगलेत मत विभाजन अटळ, चौरंगी लढतीत महायुतीला बळ

Hatkanangale Lok Sabha Election 2024 : मशाल चिन्हावर लढण्याचा ठाकरेंचा प्रस्ताव राजू शेट्टींनी नाकारला आहे. त्यामुळे ठाकरे गटानं उमेदवार देण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत, तर वंचितनेही उमेदवार जाहीर केला आहे.
Raju Shetti | Uddhav Thackeray | Dhairyashil Mane
Raju Shetti | Uddhav Thackeray | Dhairyashil ManeSarkarnama
Published on
Updated on

Political News : राज्यात महाविकास आघाडीबरोबर वंचितची फिस्कटलेली घडी आणि स्वाभिमानीने घेतलेल्या स्वतंत्र राहणाऱ्या ठाम भूमिकेमुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत जवळपास निश्चित झाली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी महाविकास आघाडीत न जाता बाहेरून पाठिंबा देण्याच्या निर्णयावर ठाम राहिल्याने ठाकरे गटाने या ठिकाणी उमेदवार देण्यावर जवळपास निश्चित केले आहे.

दोनच दिवसांत माजी आमदारांपैकी एका उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडून वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) देखील उमेदवार जाहीर केल्याने या मतदारसंघात मत विभाजनाचा फटका पुन्हा एकदा राजू शेट्टी यांना बसण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने (Dhairyashil Mane) यांचा पराभव करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाने कंबर कसली आहे. त्यातच स्वाभिमानीला सोबत घेऊन माने यांना पराभवाचा धक्का देण्याचे प्रयत्न ठाकरे गटाचे आहेत.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेला महाविकास आघाडीने बिनशर्थ पाठिंबा द्यावा, या भूमिकेत शेट्टी आहेत. तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शेट्टी यांच्यासमोर मशाल चिन्हावर निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे स्वाभिमानी आणि शिवसेनेतील चर्चा थांबली असून, ठाकरे गट हातकणंगलेत उमेदवार देण्यावर निश्चित झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाकरे गटाकडून माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर, माजी आमदार सुजित मिणचेकर यांच्या नावाची चाचपणी झाली असून, दोन दिवसांत एकाच्या नावावर घोषणा होण्याची शक्यता आहे. रविवारी शाहूवाडी येथे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली आहे.

या बैठकीत यास दुजोरा मिळाला आहे. हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेचे तीन माजी आमदारांचे बळ ठाकरे गटाच्या उमेदवारामागे राहणार आहे. शिवाय शिराळा आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची भूमिका काय असणार? हेदेखील महत्त्वाचं असणार आहे.

Raju Shetti | Uddhav Thackeray | Dhairyashil Mane
Lok Sabha Election 2024 : दोन खासदार-सहा आमदार निवडून दिलेल्या ठाकरेंचा कोल्हापूर बुरुज ढासळतोय? शिंदेंची मदार मात्र भाजपवर...

मागील लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने 1 लाख 23 हजार मते घेऊन आपला प्रभाव या मतदारसंघात दाखवला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत वंचितकडून जैन समाजाचे डी. सी. पाटील हे हातकणंगलेच्या रिंगणात असणार आहेत. या उमेदवारीमुळे वंचित बहुजन आघाडीचे दलित मते आणि जैन समाजातील मतांचे विभाजन होणार आहे.

त्याचा थेट फटका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नेते राजू शेट्टी ( Raju Shetti ) यांना बसणार आहे. जर महाविकास आघाडी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी, काँग्रेस शिवसेना ठाकरे गट, वंचित बहुजन आघाडी जर एकत्र लढले असते, तर निश्चितच महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळवणे मुश्किल झाले असते. हे चौघेही स्वतंत्र लढणार असल्याने त्याचा थेट लाभ खासदार धैर्यशील माने यांना होणार आहे.

शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील, जय किसानचे नेते शिवाजीराव माने, माजी आमदार सदाभाऊ खोत हेदेखील हातकणंगलेच्या निवडणूक रिंगणात असण्याची शक्यता आहे. त्याचा थेट फटका राजू शेट्टी यांना बसू शकतो.


( Edited By : Akshay Sabale )

R

Raju Shetti | Uddhav Thackeray | Dhairyashil Mane
Lok Sabha Election : सांगलीचा विषय संपला, ठाकरे गटाचा मैत्रीपूर्ण लढतीला विरोधच; दिल्लीत निर्णय काय?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com