shahu maharaj uddhav thackeray sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Kolhapur Lok Sabha Election 2024 : सांगलीची झळ कोल्हापुरात, ठाकरे गटानं वाढवलं शाहू महाराजांचं टेन्शन

Shivsena UBT Vs Congress : चंद्रहार पाटलांना शिवसेनेनं उमेदवारी दिल्यानंतर ठाकरे गट अन् काँग्रेसमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.

Rahul Gadkar

सांगली लोकसभा मतदारसंघात ( Sangali Lok Sabha Election 2024 ) शिवसेना आणि काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या धुसफुशीचे पडसाद आता कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात उमटत आहेत. काँग्रेसकडून मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत मिळाल्यानंतर सांगलीतील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्याचे थेट पडसाद आता कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात उमटले आहेत. याबाबतची बातमी 'सरकारनामा'ने प्रसिद्ध केली होती. अखेर ठाकरे गटाने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती ( Shahu Maharaj Chhatrapati ) यांचा प्रचार तात्पुरता थांबवला आहे.

या गोष्टीबाबत उघड उघड कोणी बोलायला तयार नसले तरी खासगीत शिवसेनेतील काही विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटानं चंद्रहार पाटील ( Chandrahar Patil ) यांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसकडून विशाल पाटील ( Vishal Patil ) यांनी मैत्रीपूर्ण लढतीचे आणि बंडखोरीचे संकेत दिलेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाला आहे. कोल्हापूर लोकसभेच्या बदल्यात सांगली लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाने काँग्रेसला दिल्याचे बोलले जाते. मात्र, सांगलीत काँग्रेसने मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत दिल्याने खासदार संजय राऊत यांनीही सर्वच जागांवर मैत्रीपूर्ण लढत होण्याचे संकेत दिलेत.

रविवारी ( 31 मार्च ) शहरात सर्व 81 प्रभाग वॉर्डमधील शिवसेना ठाकरे गटाने घेतलेला निष्ठावंत गटाचा मेळावा रद्द करण्यात आला आहे. याबाबतची माहिती ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी खासगीत दिली आहे. जोपर्यंत सांगलीत विशाल पाटील प्रचारासाठी मशाल हातात घेत नाहीत, तोपर्यंत कोल्हापुरातील ठाकरे गट शाहू महाराज छत्रपती यांच्यासाठी प्रचाराच्या रिंगणात असणार नाही, अशी आक्रमक भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT