Uddhav Thackeray News: काँग्रेसच्या नाकावर टिच्चून ठाकरेंनी टाकला डबल केसरी डाव; विशाल पाटलांनी दिल्ली गाठली...

Sangli Lok Sabha Election 2024: नाना पटोले, विश्वजित कदम, सतेज पाटील यांनीदेखील हा मतदारसंघ काँग्रेसचाच असल्याचा छाती ठोकपणे दावा केला होता.
Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray NewsSarkarnama
Published on
Updated on

Sangli: आगामी लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या उमेदवारावरून महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत कलह सुरू झाला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सांगलीचा (Sangli Lok Sabha Election 2024) उमेदवार जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये बंडाळी माजली आहे. अशातच आज शिवसेना ठाकरे गटाकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. Lok Sabha Election 2024 Shiv sena Thackery Faction Candidate Chandrahar Patil

एकीकडे काँग्रेसकडून आपल्याला विचारात न घेता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केले असल्याचा आरोप होत असताना या आरोपांना भीक न घालता शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. माजी मुख्यमंत्री ठाकरे यांनी डबल केसरी डाव टाकल्याने आता ठाकरे गट आणि काँग्रेस Congress यांच्यामधील संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच वर्षांपासून काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री वसंतराव पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून तयारी सुरू ठेवली होती. काँग्रेसच्या वाट्याला असणारा हा मतदारसंघ जागावाटपात शिवसेना ठाकरे गटाकडे गेला. कोल्हापूरच्या जागे बदल्यात सांगली मतदारसंघ आपणाला मिळावा, असा ठाकरे गटाने दावा केला होता. या सूत्रानुसारच सांगली मतदारसंघ ठाकरे गटाकडे गेल्याचे सांगण्यात येते. मात्र, या मतदारसंघावर पारंपरिक दावा सांगत बंडखोरीची, आणि वेगळा निर्णय घेण्याचा इशारा स्थानिक काँग्रेस नेत्यांकडून देण्यात आला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सांगलीचे काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम यांच्याकडूनदेखील गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत नेत्यांची भेट घेऊन हा मतदारसंघ काँग्रेसकडेच ठेवण्यासाठी आग्रह धरला होता, तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातील मिरज येथे जाहीर सभा घेऊन या सभेत चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. परस्पर उमेदवार जाहीर झाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांच्या पोटात गोळा उठला. त्यातूनच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार विश्वजित कदम, आमदार सतेज पाटील यांनीदेखील हा मतदार संघ काँग्रेसचाच असल्याचा छाती ठोकपणे दावा केला होता. मात्र, या दाव्याला ठाकरेंकडून केराची टोपली दाखवत आज उमेदवारांची घोषणा करण्यात आली. सांगलीतून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली.

Uddhav Thackeray News
Shiv Sena Thackeray Group: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; ओमराजे निंबाळकर, चंद्रहार पाटील, राजाभाऊ वाजे...

गेल्या पाच वर्षांपासून काँग्रेसकडून विशाल पाटील यांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. मात्र, चंद्रहार पाटील यांच्या एन्ट्रीने विशाल पाटील यांच्या स्वप्नांना सुरुंग लागला आहे. दुसरीकडे महायुतीकडून भाजपचे संजय काका पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. मतदारसंघात पाटील यांच्याबद्दल असलेली नाराजी काँग्रेसच्या पारड्यात मत टाकेल, असा अंदाज काँग्रेसच्या नेत्यांचा आहे. मात्र, ठाकरे गटांनी चंद्रहार पाटील यांना उमेदवार म्हणून घोषणा केल्यानंतर साहजिकच काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चिडीची भावना निर्माण झाली आहे. शिवाय वंचित बहुजन आघाडीने यापूर्वी चंद्रहार पाटील यांना पाठिंबा दिल्याचे सांगण्यात येते. काँग्रेस आपली भूमिका उघड उघड मांडत असले तरी राष्ट्रवादीने यावर मौन बाळगले आहे. राष्ट्रवादीचे आजी-माजी आमदाररांनीदेखील आपली भूमिका उघड केलेली नाही. शिवाय मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचे संजय काका पाटील यांना गुपित मदत केली, असा आरोप हे त्यांच्यावर आहे. मात्र, जयंत पाटील यांनीदेखील आपली भूमिका अजून स्पष्ट केलेली नाही.

एकंदरीतच पाहता शिवसेना ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांच्या रूपाने सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचा उमेदवार दिला असला तरी काँग्रेसमध्ये त्याबाबत नाराजी आहे. यापूर्वी उघड उघड विरोध झालाच आहे. आता मात्र महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी अटळ असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, आज सकाळी ठाकरे गटांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी दिल्लीकडे कूच केली आहे. वरिष्ठाकडे याबाबत नाराजी व्यक्त करून आपली भूमिका त्यांच्यासमोर मांडणार आहेत. त्यानंतरच आपण निवडणुकीच्या रिंगणात असणार की नसणार, याबाबत ते भूमिका जाहीर करणार असल्याचेही सांगण्यात येते.

Edited by: Mangesh Mahale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com