Loksabha Election 2024 : सांगलीत मैत्रीपूर्ण लढत; काँग्रेस हायकमांडचा ग्रीन सिग्नल

Shivsena सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उबाठा) पक्षाने चंद्रहार पाटील यांना अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला.
Vishwajit Kadam, Vishal Patil, Udhav Thackeray, Chandrahar Patil
Vishwajit Kadam, Vishal Patil, Udhav Thackeray, Chandrahar Patilsarkarnama
Published on
Updated on

Sangali News : सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. शिवसेनेची समजूत काढा न ऐकल्यास मैत्रीपूर्ण लढा, अशा स्पष्ट सूचना केंद्रीय काँग्रेसच्या नेत्यांनी प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांना दिल्या असल्याचे वृत्त आहे. याचा फैसला रविवार (दि. 31) मार्चच्या बैठकीत होणार आहे. त्यामुळे विशाल पाटील यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावरून महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून रस्सीखेच सुरू होती. ठाकरे गट, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात सांगली, रामटेक, भिवंडी यांसारख्या जागांवरून तणातणी होती. अशातच सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेना (उबाठा) पक्षाने चंद्रहार पाटील यांना अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला.

त्याबाबत राष्ट्रीय नेते मुकुल वासनिक, के. सी. वेणुगोपाल, रमेश चेन्नीथला यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार विश्वजित कदम आदींशी चर्चा केली. दोन दिवसांपूर्वी आमदार विश्वजित कदम, आमदार विक्रम सावंत, विशाल पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिल्लीत राष्ट्रीय नेतृत्वाशी सांगलीबाबत चर्चा केली होती. त्यावर आज प्राधान्याने खल करण्यात आला.

Vishwajit Kadam, Vishal Patil, Udhav Thackeray, Chandrahar Patil
Sangali News : संजयकाकांनंतर पाणीप्रश्नावर महापालिका आयुक्तांकडून झाडाझडती; कर्मचाऱ्यांना दिला कारवाईचा...

उद्धव ठाकरे Udhav Thackeray यांच्याशी सांगलीबाबत चर्चा करण्याच्या सूचना आधीच देण्यात आल्या होत्या. ठाकरे सांगलीबाबत माघार घ्यायला तयार नाहीत. संजय राऊत यांची भाषा बदलली आहे, असा निरोप आज राष्ट्रीय नेतृत्वाला देण्यात आला. अशा परिस्थितीत काँग्रेसने मैत्रीपूर्ण लढत करावी का? याबाबत प्रदेश नेत्यांची भूमिका राष्ट्रीय समितीने जाणून घेतली. प्रदेशकडून त्याला हिरवा कंदील दाखवण्यात आला. सांगलीत विजयाच्या पूर्ण संधी आहेत, तेथे मैत्रीपूर्ण लढतीला आम्ही तयार आहोत, असे नेत्यांनी सांगितले.

सांगलीबाबत सोनिया गांधी यादेखील आग्रही आहेत. सांगली मतदारसंघात तडजोड करू नका, अशी त्यांची भूमिका असल्याचे सांगण्यात आले. रविवारी दिल्लीत इंडिया आघाडीचे नेते एकत्र येत आहेत. त्यावेळी हा विषय चर्चेला समोर ठेवला जाईल. उद्धव ठाकरे यांच्याशी पुन्हा एकदा चर्चा केली जाईल. त्यानंतर काँग्रेस आपला निर्णय घेईल, असे राष्ट्रीय नेत्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे काँग्रेसचे विशाल पाटील निवडणुकीच्या रिंगणात असतील, शिवाय त्यांना हात चिन्हदेखील मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vishwajit Kadam, Vishal Patil, Udhav Thackeray, Chandrahar Patil
Mumbai Congress News : देवरा, सिद्दीकींनंतर मुंबईत काँग्रेसला तिसरा मोठा झटका; 'हा' नेता शिंदे गटाच्या वाटेवर ?

हातकणंगले, मावळ मिळाले; सांगलीचा हट्ट सोडा

शिवसेना (उबाठा) गटाने कोल्हापूरची जागा काँग्रेसला दिली आहे, तर हातकणंगले मतदारसंघात माजी खासदार राजू शेट्टी यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात आमचे ‘मशाल’ चिन्हच नसल्याने सांगलीच्या जागेचा हट्ट धरला होता. पण, आता पश्चिम महाराष्ट्रातील मावळ व हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात शिवसेनेचे ‘मशाल’ चिन्ह असणार आहे. त्यामुळे शिवसेनेने सांगलीचा हट्ट सोडावा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे नेते करत आहेत.

Edited By : Umesh Bambare

R

Vishwajit Kadam, Vishal Patil, Udhav Thackeray, Chandrahar Patil
Sangli Congress News: ...तर जिल्ह्यातील काँग्रेस विसर्जित करू; विक्रमसिंह सावंतांचा इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com