Tanaji Sawant Omraje Nimbalkar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Tanaji Sawant News : सावंतांची ओमराजेंवर सडकून टीका, "हे काय लावलंय प्रत्येकवेळी माझा बाप, माझा बाप..."

Tanaji Sawant On Omaraje Nimbalkar : तानाजी सावंत आणि ओमराजे यांच्यात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपावरून धाराशिवमधील राजकारण तापलं आहे.

Akshay Sabale

Barshi News : धाराशिव लोकसभा मतदारसंघातील ( Dharashiv Lok Sabha Constituency ) शिवसेना ( ठाकरे गट ) उमेदवार, खासदार ओमराजे निंबाळकर आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यात स्वर्गीय पवनराजे निंबाळकर यांच्यावरून खडाजंगी सुरू आहे. आता तानाजी सावंत यांनी पुन्हा एकदा ओमराजे निंबाळकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे. "एक रूपयांचा विकास केला ना कुणाला एक रूपयांची मदत केली," अशी टीका तानाजी सावंत यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर केली आहे.

धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार अर्चना पाटील ( Archana Patil ) यांच्या प्रचारासाठी बार्शीत सभा पार पडली. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ), आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार राजेंद्र राऊत ( Rajendra Raut ) उपस्थित होते. यावेळी तानाजी सावंत यांनी ओमराजे निंबाळकर यांना 'माजी खासदार' म्हणत उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनाही लक्ष्य केलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तानाजी सावंत ( Tanaji Sawant ) म्हणाले, "आम्ही कडवट शिवसैनिक आहोत. कडवट शिवसैनिक कुठल्याही सत्तेपुढं आणि आमिषापुढं झुकला नाही. 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं की, 'धाराशिव लोकसभेची जागा निवडून आणायची आहे.' त्यानंतर माजी खासदारांना ( ओमराजे निंबाळकर ) विकासासाठी, मोदींसाठी आणि सत्तेत आपला लोकप्रतिनिधी असावा म्हणून निवडून आणलं."

"धाराशिवमध्ये फक्त विकासाची भाषा चालते"

"पण, 2009 पासून आजपर्यंत त्यांच्या ( ओमराजे निंबाळकर ) भाषणाची सुरूवात माझा बाप मारला, माझा बाप मारला, अशी होते. अरं काय लावलंय हे? भावनेच्या आहारी जाऊन 2009 मध्ये जनतेनं एकदा आमदार केलं. त्याच जनतेनं 2014 मध्ये घरी बसवलं. एक रूपयाचा विकास केला ना एक रूपयांची कुणाला मदत केली. भावनेच्या आहारी जाणारा हा मतदारसंघ नाही. धाराशिवमध्ये फक्त विकासाची भाषा चालते," असं तानाजी सावंत यांनी म्हटलं.

"ठाकरेंचा निर्णय उलथवून टाकण्याची सुरूवात धाराशिवमधून"

"महाराष्ट्र विकासाच्या प्रगतीपथावर चालला होता. पण, 2019 साली हिंदुत्वाची आणि विकासाची नाळ तोडून महाराष्ट्राच्या विकासाला खिळ बसवण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्या निर्णयाला उलथवून टाकण्याची सुरूवात धाराशिवमधून झाली. त्याचे साक्षीदार आणि मार्गदर्शक देवेंद्र फडणवीस आहेत," असं विधानही तानाजी सावंत यांनी केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT