Udayanraje Bhosale Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Udayanraje Bhosale : दिल्लीवरून येताच साताऱ्याबाबत उदयनराजेंची मोठी घोषणा; 'पक्षश्रेष्ठींचे आदेश की...'

Satara Lok Sabha Constituency : 'कालही जनतेचा होतो, आजही आहे आणि भविष्यातही लोकहिताची कामे माझ्याकडून होत राहतील'

Umesh Bambare-Patil

Satara Lok Sabha News : सातारा लोकसभेच्या उमेदवारीबाबत पक्षश्रेष्ठींनी मला काय सांगायचे ते सांगितले आहे. महायुतीतील माझे सगळे सहकारी व मित्र असून भाजपचे नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही बोलणे झाले आहे. आता शंका घेण्याची गरज नसून मी निवडणूक लढणारच, असे सांगून खासदार उदयनराजे भोसले यांनी महायुतीकडून अधिकृत घोषणा होण्यापूर्वी साताऱ्यावरील दावा कायम ठेवला.

सातारा लोकसभेच्या उमेदवारीसाठी चर्चा करण्यासाठी उदयनराजे भोसलेंनी (Udayanraje Bhosale) दिल्लीत जाऊन वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांचे बुधवारी (ता. २७) साताऱ्यात आगमन झाले. या वेळी समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उदयनराजेंचे शिरवळ येथे जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना उदयनराजेंनी पक्षश्रेष्ठींनी सांगितल्यानुसार सातारा लोकसभा लढणार असल्याचे स्पष्ट केले. कालही जनतेचा होतो, आजही आहे आणि भविष्यातही लोकहिताची कामे माझ्याकडून होत राहतील, असे सूचक विधान त्यांनी केले.

महायुतीत साताऱ्याच्या (Satara) जागेवर अद्याप स्पष्ट निर्णय झालेला नाही. यावर उदयनराजे म्हणाले, या शक्तिप्रदर्शनातून कोणालाही इशारा नाही. उमेदवारांची यादी जाहीर होईल. सगळे निश्चित झाले आहे. मी निवडणूक लढणारच आहे. लोकसभेच्या निवडणुकीची संपूर्ण देशभरात प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणूक होणाऱ्या मतदारसंघात महायुतीतील तेढ निर्माण झाली होती. ती सोडविण्याचे काम झाले आहे. आता कोणतीही शंका नाही, असेही उदयनराजे यांनी सांगितले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) महायुतीचे जागावाटपाचे काम झाले आहे. सर्व नेते मिळून युतीची यादी गुरुवारी (ता. २८) जाहीर होणार असल्याचे सांगितले आहे. त्यावर उदयनराजे म्हणाले, पक्षश्रेष्ठींनी मला काय सांगायचे ते सांगितले आहे. माझे महायुतीतील घटक पक्षात जे सहकारी आहेत. यामध्ये भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत माझे बोलणे झाले आहे. आता यात शंका घ्यायची गरज नाही. तिकिटाविषयी आता वेगळे सांगायची गरज नाही, असे सांगून उदयनराजेंनी आपले तिकीट निश्चित झाल्याचे संकेत दिले.

दरम्यान, सातारा जागेवर राष्ट्रवादीने दावा सांगितला आहे. त्यामुळे उदयनराजेंनी राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करून लढावे, अशी चर्चा होती. मात्र, भाजपकडून लढण्याच्या उदयनराजेंच्या भूमिकेवर अजित पवारांनी भाजप नेते त्यांना समजावून सांगतील, असे म्हटलेले आहे. आता महायुतीच्या गुरुवारी येणाऱ्या यादीत ही जागा कुणाकडे असणार याकडे लक्ष लागले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT