Sangli Political News : सांगली लोकसभेचा उमेदवार ठाकरे गटाने परस्पर जाहीर केलेला आहे. त्याला महाविकास आघाडीची कुठल्याही प्रकारची सहमती नाही. तसेच कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असे कधीही ठरले नव्हते, असे म्हणत काँग्रेस नेते माजी मंत्री विश्वजित कदमांनी सांगलीतून काँग्रेस लढणारच, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत सांगलीची जागा कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.
ठाकरे गटाने आपल्या 17 उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. त्यात सांगलीतून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांचे नाव आहे. त्यानंतर येथून काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या विशाल पाटील, विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांनी काही नेत्यांसह थेट दिल्ली गाठली. तेथे वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर कदम प्रसारमाध्यामांशी बोलत होते. या वेळी त्यांनी सांगलीची जागा आम्ही सोडलेली नसून येथून काँग्रेसचे विशाल पाटील हे आमचे उमेदवार असल्याचे स्पष्ट केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कदम म्हणाले, मी माझ्या भावना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवल्या आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा आहे. तो लढायला आम्ही सक्षम आहोत. मी आणि स्थानिक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विशाल पाटलांची (Vishal Patil) उमेदवारी निश्चित केली आहे. त्याला पक्षानेही दुजोरा दिला आहे. जर-तरच्या प्रश्नावर आम्हाला लढायचे नाही. आम्हाला खात्री आहे की काँग्रेसच्या जागेवरच आम्हाला निवडणूक लढवायची आहे. काँग्रेसकडून मैत्रीपूर्ण लढत करायची असेल तर आम्ही त्यालाही तयार आहोत. मात्र, वरिष्ठांनी तो निर्णय दिल्यास आम्ही त्यालाही तयार आहोत, असेही कदमांनी या वेळी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील इतर जागावाटपाबाबत महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसत होते. सांगलीची जागा काँग्रेसने सोडलेली नाही. बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) देखील वारंवार सांगलीची जागा आपलीच असल्याचे सांगतात. सांगलीच्या जागेसाठी मीही आक्रमक भूमिका घेतली आहे. आम्ही आमच्या भावना दिल्लीच्या वरिष्ठ नेत्यांच्याकडे मांडलेल्या आहेत. दिल्ली आणि राज्यातील नेत्यांसोबत कार्यकर्त्यांशी चर्चा करून योग्य ते निर्णय घेणार असल्याचे आमदार कदम यांनी सांगितले.
विशाल पाटील यांनी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस एकत्रित प्रथमच निवडणूक लढवत आहे. यापूर्वी राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र लढली आहे. आम्ही नेत्यांचा शब्द घेऊन बोलत आहे. सांगली आणि दोन जागेवर अजूनही तडजोड झालेली नाही. शिवसेनेने परस्पर नाव जाहीर केले असेल. काँग्रेस हा जबाबदार पक्ष आहे. परस्पर नावे जाहीर करून पाऊल मागे घेणार नाही. यातून मार्ग नक्की निघेल, असे सांगितले. आम्ही काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहोत, आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वात आम्ही एकसंघ आहोत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथून पुढच्या निवडणूक लढवणार आहोत. ते जो आदेश देतील तो मैत्रीपूर्ण किंवा शत्रुत्वाशी असो आम्ही निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले.
(Edited by Sunil Dhumal)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.