vishal patil, chandrahar patil  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangali Lok Sabha Election 2024 : 'सांगली'त काँग्रेस की ठाकरे सेना; दिल्लीत वाद मिटणार?

Congress V Shivsena : उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर शिवसेना अन् काँग्रेस समोरा-समोर उभे ठाकले आहेत.

Anil Kadam

सांगली लोकसभा मतदारसंघाच्या ( Sangli Lok Sabha Election 2024 ) जागेवरून विकास महाआघाडीत शिवसेना व काँग्रेसमधील मतभेद टोकाला गेले आहेत. त्यामुळे जागेसंदर्भात अद्याप निर्णय झाला नाही. यावर आता रविवारी ( 31 मार्च ) दिल्लीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची चर्चा होणार आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसला मिळणार की शिवसेना? का या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघावरून ( Sangli Lok Sabha Election 2024 ) महाविकास आघाडीत शिवसेना व काँग्रेसमध्ये वाद चांगलाच रंगला आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) व नेते संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी मिरजेतील जाहीर सभेत चंद्रहार पाटील ( Chandrahar Patil ) यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर पाटील प्रचाराला लागले आहेत. काँग्रेसने याबाबत दिल्ली पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त केली आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये आमदार विश्वजीत कदम, आमदार विक्रम सावंत, विशाल पाटील व पृथ्वीराज पाटील यांनी दिल्लीत राष्ट्रीय नेत्यांची भेट घेवून सांगलीबाबत आग्रही राहण्याची विनंती केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दिल्ली पक्षश्रेष्ठींनी सांगली लोकसभा मतदारसंघातील वादावर थेट ठाकरे गट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोला. वाद मिटत नसेल तर मैत्रीपूर्ण लढत करा, अशा सूचना प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांना दिल्या. या संदर्भात दोन दिवसांपूर्वी मुंबईतील एका हॉटेलमध्ये बैठक देखील झाली, मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांनी या बैठकीला गैरहजेरी दाखविली. शिवसेनेची आडमुठी भूमिका सुरू असल्याने काँग्रेसचे नेते देखील नाराज झाले.

मैत्रीपूर्ण लढतीला शिवसेनेने विरोध केला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी या संदर्भात दिल्लीच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करावी, असा पवित्रा घेतला. रविवार 31 मार्च रोजी दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेसचे वरिष्ठ नेते शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. तीन जागांचा वाद सुटण्याची शक्यता आहे. वाद न सुटल्यास सांगलीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे रविवारी होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

'मविआ'च्या उमेदवारांची बुधवारी एकत्रित घोषणा

राज्यातील 48 जागांवरील महाविकास आघाडीचे उमेदवार बुधवार 3 एप्रिलला जाहीर करण्यात येणार आहेत. काँग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट या तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित येऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा करणार आहेत.


( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT