Sanjay Raut On Ambedkar : संजय राऊतांचे प्रकाश आंबेडकरांना सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाले...

MVA Vs Vanchit : आघाडीत सहभागी होण्यासाठी वंचितकडून चर्चेचे दार उघडे असल्याचे स्पष्ट केले आहे. तर शरद पवारांनीही वंचितचे महाविकास आघाडीत स्वागत असल्याचे म्हटले आहे.
Prakash Ambedkar, Sanjay Raut
Prakash Ambedkar, Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Politics : एकीकडे वंचितला सोबत घेण्याबाबत जाहीर बोलायचे आणि दुसरीकडे 'सिल्व्हर ओक'वर बैठक घेत जागावाटप करायचे. अशा बैठकांपासून वंचितला दूर ठेवायचे, असे करून खासदार संजय राऊत वंचितच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) केला. मात्र, जागावाटपाच्या कुठल्याही छुप्या बैठका झाल्या नाहीत, असे सांगून राऊतांनी आंबेडकरांचे सर्व आरोप खोडून काढले. Sanjay Raut On Ambedkar

जागावाटपावरून वंचित आणि महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे बोलले जात आहे. वंचितने (Vanchit) लोकसभेसाठी आपल्या उमेदवारांची स्वतंत्र यादी जाहीर केली आहे. त्यानंतर आंबेडकरांनी ठाकरे गटाचे नेते, खासदार राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्या आरोपांना राऊतांनीही प्रत्युत्तर देत खुलासा केला. तसेच आंबेडकर आम्हाला प्रिय असून, त्यांनी महाविकास आघाडीत यावे, असेही त्यांनी सांगितले.

Prakash Ambedkar, Sanjay Raut
Ramdas Athawale News : 'शरद पवारांना भेटलो असतो तर एक तरी जागा मिळाली असती...' ; आठवलेंनी काढला चिमटा!

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, वंचित-ठाकरे गटात सर्वात आधी आघाडी झाली. त्यामुळे जागावाटपाच्या कुठल्याही छुप्या बैठका झालेल्या नाहीत. सिल्व्हर ओकवर जागावाटपाची चर्चा झाली नाही. यापूर्वी अकोल्यासह तीन जागांचा प्रस्ताव होता. आता दोन दिवसांपासून आम्ही पाच जागांची ऑफर दिलेली आहे. त्यात रामटेक या ठाकरे गटाच्या सीटिंग जागाचाही समावेश आहे. त्यामुळे आता जागावाटपाबाबत आघाडीतील कोणीही खोटे बोलत नाही. दरम्यान, आघाडीत सहभागी होण्यासाठी वंचितकडून चर्चेचे दार उघडे असल्याचे स्पष्ट केले आहे, तर शरद पवारांनीही (Sharad Pawar) वंचितचे महाविकास आघाडीत स्वागत असल्याचे म्हटले आहे.

आंबेडकरांचे आरोप काय?

तुमची आणि माझी मते सारखीच असतील तर तुम्ही आम्हाला बैठकीला का बोलवत नाही? फोर सीझन्स हॉटेलमध्ये 6 मार्चला झालेल्या बैठकीनंतर तुम्ही आमच्या कोणत्याही प्रतिनिधीला का बोलावले नाही? वंचितांना आमंत्रण न देता आजही सभा का घेत आहात? सहयोगी राहून तुम्ही पाठीवर वार केलेत! 'सिल्व्हर ओक'वरील बैठकीत काय झाले, त्याची माहिती आहे. तुम्ही कोणत्या प्रकारचे नाते निर्माण करत आहात? एकीकडे युती केल्याचे भासवता तर दुसरीकडे आम्हाला गृहीत धरण्याचे कारस्थान करता. संजय राऊत आणखी किती खोटे बोलाल? असे गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केले होते.

(Edited by Sunil Dhumal)

R

Prakash Ambedkar, Sanjay Raut
BACCHU KADU : अमरावतीत प्रहार ची 'फाइट' वातावरण एकदम 'टाइट'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com