Uttam Jankar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Uttam Jankar News : "अजितदादांचा पराभव करूनच पक्ष सोडणार", उत्तम जानकर कडाडले

Uttam Jankar On Ajit Pawar : "मी अजितदादांना पक्षातून काढून टाकेल," उत्तम जानकर असं का म्हणाले?

Akshay Sabale

माढा मतदारसंघात ( Madha Lok Sabha Election 2024 ) चर्चेत आलेलं नाव म्हणजे उत्तम जानकर. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी चर्चेसाठी उत्तम जानकर यांना चॅर्टर विमान पाठविल्यानं ते चर्चेत आले होते. पण, उत्तम जानकर यांनी लोकसभा निवडणुकीत 30 वर्षांपासून वैर असलेल्या मोहिते-पाटील यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. आता उत्तम जानकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांना लक्ष्य केलं आहे.

उत्तम जानकर ( Uttam Jankar ) हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत. पण, अद्यापही त्यांनी 'तुतारी' हाती घेतली नाही. त्यामुळे हात घड्याळ्यात अडकलाय का? असा सवाल विचारण्यात आला. त्यावर "हात घड्याळात अडकला नाही. मात्र, अजितदादांनी मला पक्षातून काढून टाकलं, तर मी अजितदादांना पक्षातून काढून टाकेल," असं विधान उत्तम जानकरांनी केलं आहे. ते एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत होते.

उत्तम जानकर म्हणाले, "अजितदादा हे शरद पवारांनी लावलेलं रोपटे आहेत. बारामतीचा किल्लेदार म्हणून अजिदादांना नेमलं होतं. आता किल्लेदार फितूर झाले आहेत. किल्ला एकदा हातातून जाऊ शकतो. मात्र, यंदा शरद पवार सावध आहेत."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'तुतारी' हाती घेणार की हात 'घड्याळा'त अडकला आहे? या प्रश्नावर उत्तम जानकरांनी म्हटलं, "हात घड्याळ्यात अडकलाय, असं काही नाही. मी अजितदादांच्या राष्ट्रवादीत असून पक्ष सोडलेला नाही. अजितदादांच्या पराभवात माझाही हातभार असेल. त्यानंतरच पक्ष सोडेन. अजितदादांनी जसं शरद पवारांना पक्षातून काढून टाकलं, तसं मला काढलं, तर मी अजितदादांना काढून टाकेल."

अजितदादांच्या दराऱ्याची भीती वाटत नाही का? या प्रश्नावर जानकर म्हणाले, "मला भीती वाटत नाही, मला स्वाभिमान आहे. तालुक्यातील जनतेचा स्वाभिमान जपणं हीच माझी भूमिका आहे. आपल्या प्रपंचासाठी ही लढाई नाही. गोरगरिबांमध्ये माझ्या रूपानं भविष्य लपलं आहे. मी बेईमान झालो, तर लोकांची एक पिढी बर्बाद होईल. विजय होऊद्या किंवा पराभव होऊद्या लोकांबरोबर राहणं ही माझी भूमिका आहे."

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT