Uttam Jankar News: फडणवीसांची ऑफर धुडकावत अन् 30 वर्षांचं वैर संपवत अखेर जानकरांचा मोहिते पाटलांना पाठिंबा

Madha Loksabha News: भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तम जानकर यांना महायुतीत राहण्यासाठी जोरदार प्रयत्न केले.
devendra fadnavis uttam jankar sharad pawar
devendra fadnavis uttam jankar sharad pawarsarkranama

Madha News : माढा मतदारसंघात रोज नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे.राजकीय घडामोडींना वेग पकडला असून ही निवडणूक भाजपसह मोहिते पाटील गटाने प्रतिष्ठेची केली आहे.याच पार्श्वभूमीवर राज्यातील भाजपचा प्रमुख चेहरा असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेली ऑफर धुडकावत आणि 30 वर्षांची राजकीय शत्रुत्व संपवत उत्तम जानकर यांनी मोहिते पाटील गटात एन्ट्री घेतली आहे. यामुळे माढा मतदारसंघाची राजकीय गणितं पूर्णपणे बदलली जाण्याची शक्यता आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरसचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उत्तम जानकर यांनी शुक्रवारी (ता.19) वेळापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे जाहीर केले होते.त्यानुसार ते या मेळाव्याला उपस्थित राहिले.

devendra fadnavis uttam jankar sharad pawar
Devendra Fadnavis : मतदानाची टक्केवारी घसरली; बाहेर निघा, मतदान करा फडणवीसांची हाक !

या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जयसिंह मोहिते पाटील या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.यावेळी माढ्याचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील,उत्तम जानकर, महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते वेळापूरमध्ये एकत्र आलेले दिसून आले.त्यानंतर जानकर नेमके काय भूमिका घेतात हे याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते.

माळशिरस तालुक्याचे माजी आमदार असलेल्या उत्तम जानकरांनी मोहिते पाटील गटाशी जवळीक साधण्याचा केलेला प्रयत्न करत नवा पत्ता टाकला होता.तसेच त्यांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारीवर जाहीर नाराजी व्यक्त करत शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांना (Dhairyashil Mohite Patil) पाठिंबा देण्याची तयारी सुरू केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यानंतर महायुतीकडून विशेषत: भाजपकडून वेगाने सूत्रे फिरली अन् खास विमानाने उत्तमराव जानकर (Uttam Jankar) यांनी नागपूर गाठले. तिथे भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तम जानकर यांना महायुतीत राहण्यासाठी जोरदार प्रयत्न केले.एवढेच नाहीतर चक्क माळशिरसमधून विधानसभा निवडणुकीचे तिकीट देत निवडून आणण्याची ऑफरसुध्दा दिली. या भेटीनंतर जानकर रणजितसिंह निंबाळकरांना साथ देतील अशी शक्यता वर्तवली जात होती.

पण काहीच दिवसांत त्यांनी पुन्हा एकदा थेट शरद पवारांची भेट घेतली.यानंतर मात्र ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची चर्चा होती. जानकरांची मनधरणी करण्यात फडणवीसांना सपशेल अपयश आले. आता जानकरांनी धैर्यशील मोहिते पाटलांना पाठिंबा दिल्यामुळे माढ्यात रणजितसिंह निंबाळकरांची वाट खडतर झाली आहे.

devendra fadnavis uttam jankar sharad pawar
Asaduddin Owaisi News: 'हा' भाजपची 'बी टीम'चा शिक्का पुसण्याचा ओवैसींचा प्रयत्न तर नाही ना ?

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com