vishal patil  sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vishal Patil News : बापासारखं खासदार व्हावसं वाटतं, ही माझी चूक आहे का? भरसभेत विशाल पाटलांच्या डोळ्यात अश्रू

Akshay Sabale

शिवसेनेनं ( ठाकरे गट ) चंद्रहार पाटील ( Chandrahar Patil ) यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर सांगली काँग्रेसमध्ये वाद उफाळून आला. माजी मंत्री, विश्वजित कदम ( Vishwajeet Kadam ) आणि विशाल पाटील ( Vishal Patil ) यांनी काँग्रेसला जागा सुटावी, यासाठी प्रयत्न केले. पण, अखेर महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा शिवसेनेकडेच राहिली. त्यामुळे अखेर विशाल पाटील यांनी बंड करत अपक्ष आणि काँग्रेसकडून अर्ज दाखल केला आहे. यानंतर मंगळवारी झालेल्या सभेत वडील आणि आजोबांच्या आठवणींना उजाळा देताना विशाल पाटील भावूक झाले.

विशाल पाटील ( Vishal Patil ) म्हणाले, "वसंतदादा घराण्याचं काँग्रेस पक्षावर प्रचंड प्रेम आहे. 1917 मध्ये वसंतदादाचा जन्म झाला. 1919 साली वसंतदादांचे छत्र हरपलं. लोकांनी साथ दिली, पाहुण्यांनी आधार दिला, तरुणपणात वसंतदादांना काँग्रेस सापडली. त्या काँग्रेसनं वसंतदादांना घडवलं. वसंतदादांनी काँग्रेसच्या जोरावर स्वातंत्र्य मिळवलं आहे."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"1999 पासून मी काँग्रेसचं काम करत आहे. माझ्या वडिलांना खासदार म्हणून मी पाहिलं आहे. प्रत्येक घरातील पोराला आपल्या बापासारखं झालं पाहिजे, असं वाटतं. तसे मलाही वाटतं. वसंतदादांच्या घरात जन्माला आलो, ही माझी चूक झाली का? आजोबा आणि वडिलांसारखं झालो, तर ती माझी चूक आहे का? मी स्वार्थासाठी लढत नाही," असं म्हणताना विशाल पाटलांच्या डोळ्यात अश्रू आले.

"2002 मध्ये मला जिल्हा परिषदेवर जायचं होतं, पक्षातील वरिष्ठांनी घराणेशाही होईल सांगितलं, मी थांबलो. 2005 मध्ये वडिलांचं निधन झाल्यानंतर मी उभारलं पाहिजे, असं वाटत होते. उमेदवारी आमच्या घरात मिळाली, मी तक्रार केली नाही. लोकं म्हणाली थांबा आणि कामाला लागा... तेव्हा मी सगळ्यात पुढे पळत होतो. जेव्हा, जेव्हा काँग्रेसनं थांबा म्हटलं, तेव्हा मी थांबलो," अशी खंत पाटलांनी व्यक्त केली.

"2019 मध्ये सगळे म्हणत होते, मी उभारलं पाहिजे, तेव्हा पक्षानं जागाच सोडून दिली. मला दुसऱ्या पक्षातून उभे राहायला सांगितलं. पक्षावर एकतर्फी प्रेम असल्यानं मीसुद्धा दुसऱ्या चिन्हावर लढतो. पण, पराभव झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो," असं विशाल पाटलांनी म्हटलं.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT