Vishal Patil-Vishwajeet kadam
Vishal Patil-Vishwajeet kadam Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Vishal Patil News : "विश्वजित आमच्या विमानचे पायलट, नेतील तिथे जाऊ, पण...", भाजप प्रवेशावर विशाल पाटील स्पष्टच बोलले

Anil Kadam

सांगली : 11 मार्च | सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाला जाणार असल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील ( Vishal Patil ) हे भाजपमध्ये जातील, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपच्या संभाव्य यादीत विशाल पाटलांचे नाव असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. परंतु, विशाल पाटलांनी चर्चा फेटाळून लावली. "मी काँग्रेसमधून निवडणूक लढायला तयार आहे. पण, मला जर तिकीट मिळाले नाही, वेगळा विचार नसून, प्रसंगी थांबायची तयारी आहे," असं विशाल पाटलांनी स्पष्ट केलं.

पलूस तालुक्यातील बुर्ली ते सूर्यगाव या कृष्णा नदीवरील पुलाच्या भूमिपूजन सोहळ्यात विशाल पाटील ( Vishal Patil ) बोलत होते. या वेळी राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट, माजी मंत्री विश्वजित कदम, जिल्हा बँकेच संचालक महेंद्र लाड उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"दुसर्‍याचे श्रेय घेऊन नारळ फोडतात"

विशाल पाटलांनी खासदार संजयकाका पाटील ( Sanjaykaka Patil ) यांच्यावर टीका केली आहे. "आपल्याला हिंदी बोलणारा चांगला खासदार भेटला असता, तर आज जिल्ह्यातील बरेच प्रश्न संसदेत मांडले गेले असते आणि सुटले असते. मात्र, आमचे खासदार दिल्लीत जाऊन प्रश्न मांडण्यापेक्षा गल्लीत बसतात. राजा-राजा करत खांद्यावर हात टाकतात आणि दुसर्‍याचे श्रेय घेऊन नारळ फोडतात," अशा शब्दांत विशाल पाटलांनी संजयकाका पाटलांचा समाचार घेतला आहे.

"काहींनी पदे भोगूनदेखील काँग्रेस पक्ष सोडला"

"काँग्रेस पक्ष आज जोमाने काम करत आहे. तरुण पिढीकडे सध्या काँग्रेस पक्ष जात आहे. पक्षात काही गोष्टी चांगल्यासाठी घडत आहेत. कारण काहींनी पदे भोगूनदेखील काँग्रेस पक्ष सोडला आहे. त्यामुळे आपली वाट मात्र आता मोकळी झाली आहे," असं विशाल पाटलांनी म्हटलं.

"आमचे पायलट ‘विश्वजित’च"

"विश्वजित कदम यांना महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल. आतापर्यंत आमची बुद्धी भ्रष्ट झाली होती. मात्र, आता आमची हौस भागली आहे. आता आम्ही ज्या विमानात बसायचा निर्णय घेतलाय त्या विमानाचे 'विश्वजित' पायलट आहेत. ते नेतील तिथे जाऊ, पण आज आमच्याबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र, वेगळा काहीतरी विचार करण्यापेक्षा आमची थांबायची तयारी आहे," असं विशाल पाटलांनी स्पष्ट केलं.

फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर विश्वजित कदमांचा खुलासा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वजित कदमांना थेट मुहूर्त लावतो, या केलेल्या वक्तव्यावरून चर्चा रंगली होती. या मुहूर्ताचा विश्वजित कदम यांनी खुलासा केला. "आपल्या आयुष्यात केवळ आत्तापर्यंत तीन मुहूर्त आले. देवेंद्र फडणवीस यांची भेट मतदारसंघातल्या टेंभू सिंचन योजनेबाबत मागितली होती. यातून देवेंद्र फडणवीस यांनी गमतीने बैठकांचा मुहूर्त लावण्याचे वक्तव्य केले होते," असं विश्वजित कदमांनी सांगितलं.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT