Shahu Maharaj Chhatrapati, Narendra Modi Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shahu Chhatrapati On PM Modi : काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर होताच शाहू छत्रपती पंतप्रधानांवर बरसले

Shahu Maharaj Chhatrapati On PM Narendra Modi : इंडिया आघाडी व महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी जाहीर झाली आहे.

Rahul Gadkar

Shahu Maharaj Chhatrapati News : इंडिया आघाडी व महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. ते आता काँग्रेसच्या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढविणार आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शाहू महाराजांनी (Shahu Maharaj Chhatrapati) पत्रकार परिषदेत घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.

ते म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे काम आणि कार्य नाकारून चालणार नाही. मात्र, समाजकारण आणि राजकारणाला जी दिशा मिळायला हवी होती, ती मिळाली नाही. त्यांनी योग्य दिशा दिली असती तर आज ही वेळ त्यांच्यावर आली नसती. समाज आणि राजकारणाची दिशा सुधारण्यासाठी ते विशेष प्रयत्न करत नसल्यामुळेच सगळे पक्ष त्यांच्या विरोधात आले आहेत."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जनतेच्या आग्रहामुळेच लोकसभेच्या मैदानात

या वेळी शाहू महाराज (Shahu Maharaj Chhatrapati) म्हणाले, जनतेच्या प्रचंड आग्रहामुळे मी निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहे. कोल्हापूरच्या (Kolhapur) विकासाला नवीन चेहरा आणि गती देण्यासाठी माझी उमेदवारी आहे. विकास तर सगळेच करत असतात, मात्र त्याला योग्य दिशा देण्याचे काम माझे असेल.

वेगाने विकसित होणाऱ्या शहरांच्या पंगतीत कोल्हापूर उठावदार दिसेल, येथील तरुणांच्या गुणवत्तेला वाव मिळेल, सुशिक्षितांच्या हाताला रोजगार मिळेल. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक होईल. तसेच आघाडीच्या नेतेमंडळींचा पाठिंबा आणि संबंध जिल्ह्यातील नागरिकांचा प्रतिसाद पाहता ही निवडणूक आपण जिंकू, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

ते म्हणाले, "जनतेने माझ्यावर विश्वास ठेवला आहे. शाहू, फुले, आंबेडकरांचा Shahu, Phule, Ambedkar समतेचा विचार पुढे नेण्याची गरज आहे. शाहू, फुले, आंबेडकरांचा प्रभाव माझ्यावर आहे. यापूर्वी राजकारणात प्रत्यक्षात नव्हतो, पण आता समाजकारणाला राजकारणाची जोड देणार. तसंच सर्वांना वाटलं असावं, की महाराजांची गरज असावी म्हणून मला उमेदवारी देण्यात आली."

कोल्हापूर-कोकण रेल्वे, विमानतळ याबरोबरच अनेक प्रश्नांवर कामं करणार असल्याचंही त्यांनी या वेळी सांगितलं. शिवाय कोल्हापूरकरांनी संधी दिली तर महाराष्ट्राला नेतृत्व देण्याचा माझा प्रयत्न असेल. आज महाराष्ट्रातील परिस्थिती पाहिली तर गेल्या 60 वर्षांत जी परिस्थिती नव्हती तशी अस्थिर परिस्थिती निर्माण झाली आहे.

याच कारणाने पक्षांतर बंदी कायदा फेल झाला आहे. कोल्हापूर विमानतळाला राजाराम महाराजांचे नाव मिळायला हवं. ते का मागे पडत आहे समजत नाही? असा प्रश्न उपस्थित करतच, मान गादीला आणि मतदेखील गादीलाच मिळणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देश एकाधिकारशाहीकडे वळत आहे, लोकशाही टिकली पाहिजे, म्हणूनच मी लोकसभेच्या मैदानात उतरलो असल्याचंही ते या वेळी म्हणाले.

(Edited By Jagdish Patil)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT