Satara News : सातारा लोकसभा मतदारसंघातील पाटण विधानसभा मतदारसंघात समाविष्ट साजुर गावातील 358 मतदान केंद्र हे जुने साजुर गावात आहे. मात्र, यावर्षी लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाच्या चुकीमुळे हे मतदान केंद्र एक किलोमीटर अंतरावरील जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरीत करण्यात आले आहे. प्रशासनाने वस्तुस्थितीची पाहणी न करता गुगल मॅपवर केंद्र निश्चित केले आहे. त्याचा निषेध म्हणून साजुर जुन्या गावातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याची माहिती माजी पंचायत समिती सदस्य विजय चव्हाण यांनी दिली. (Lok Sabha Election 2024)
चव्हाण म्हणाले, "सातारा लोकसभा मतदार संघातील पाटण विधानसभा मतदार संघातील साजुर या गावातील 358 मतदान केंद्र हे जुने साजुर गावात आहे. मात्र यावर्षी लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाच्या चुकीमुळे हे मतदान केंद्र एक किलोमीटर अंतरावरील जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरीत करण्यात आले आहे."
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
स्वातंत्र्यानंतरच्या आजपर्यंतच्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या सर्व निवडणुका (Election) या मतदान केंद्रावर होत होत्या. सुमारे 800 मतदार या ठिकाणी आहेत. सध्या उन्हाचा तडाखा वाढला असताना एक किलोमीटर जुन्या साजुर गावातील लोकांना मतदानासाठी जावे लागणार आहे. त्यामुळे त्यांची गैरसोय होणार आहे.
ही प्रशासनाची चूक आहे. त्यासाठी पाटणचे प्रांताधिकारी, तहसीलदार यांना यासंदर्भातील माहिती देऊन मतदान केंद्र पुर्ववत जुन्या गावात ठेवण्याची मागणी केली. मात्र त्यांनी गुगल मॅपवर आम्ही मतदान केंद्र निश्चित केल्याचे सांगितले. वस्तुस्थितीची पाहणी न करता मतदारांची गैरसोय कशी होईल हे प्रशासनाने बघितले आहे. त्यामुळे प्रशासनाचा निषेध म्हणून साजुर जुन्या गावातील 368 मतदान केंद्रावर मतदान करणारे मतदार हे मतदानावर (Voting) बहिष्कार टाकणार आहेत.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.