Leaders of Mahayuti Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Mahayuti News : महायुतीच्या जागा वाटपाचा मुहूर्त ठरला; अजित पवारांच्या विश्वासू सहकाऱ्यानेचं सांगितलं...

Sunil Tatkare : 48 जागांबाबत सखोल चर्चा करू. आम्ही 45 प्लसचे उद्दिष्ट ठेवले आहे. या संदर्भातील अंतिम निर्णय दिल्लीत होईल.

Vishal Patil

karhad : लोकसभेची धामधूम सर्वच पक्षात पहायला मिळत असून महायुतीत भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी (अजित पवार गट) वेगवेगळ्या जागांवर दावा सांगत आहेत. यामुळे महायुतीत एकवाक्यता नसल्याचे दिसत असल्याने काही निर्बंध महायुतीच्या बैठकीत घालण्यात आले आहेत. तेव्हा आता जागा वाटपासाठी महायुतीची बैठक केव्हा होणार आणि अंतिम निर्णय कधी घेणार याबाबत अजित पवारांचे विश्वासू सहकारी सुनील तटकरे यांनी सांगितले आहे.

''जानेवारी महिना अखेरीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde ), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आणि अजित दादा, चंद्रशेखर बावनकुळे, मी स्वतः आणि घटक पक्षाचे प्रमुख बसून 48 जागांबाबत सखोल चर्चा करू. आम्ही 45 प्लसचे उद्दिष्ट ठेवले आहे. या संदर्भातील अंतिम निर्णय दिल्लीत होईल. तसेच 15 फेब्रुवारीपर्यंत जागावाटपा बाबत अंतिम निर्णय होईल.", असे सुनिल तटकरे यांनी सांगितले. 

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सातारा लोकसभा कोणाकडे?

महायुतीतील कोणत्याही नेत्यांने लोकसभा जागेबाबत वक्तव्य करू नये, असा निर्णय आम्ही 14 जानेवारीच्या बैठकीत घेतला आहे. आता राज्यपातळीवरील नेते एकत्रित बसणार असून जागांबाबतचा निर्णय घेणार आहोत. अजित दादांनी जो सातारा लोकसभेवर दावा केला आहे तो खरा आहे. राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने कर्जत येथील शिबिरात दादांनी रायगड, सातारा, शिरूर आणि बारामती या जागांवरील भावना व्यक्त केल्या आहेत. मात्र, अंतिम निर्णय महायुतीच्या बैठकीतच होईल, असे खासदार सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले. 

संजय राऊत वैफल्यग्रस्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकात आले पण सावकर यांच्या स्मारकाजवळ का गेले नाहीत, असा प्रश्न ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला होता. त्याला सुनिल तटकरे यांनी प्रत्युत्तर दिले. संजय राऊत मोठ्या प्रमाणावर वैफल्यग्रस्त झाले आहे. राजकारणात टीकाटीप्पणी व्हावी. परंतु, महाराष्ट्राच्या संस्कृतीला छेद देणारी टीका होते. त्यावर मला फारसं भाष्य करावसं वाटतं नाही. काळाराम मंदिरात जाण्याचा प्रत्येकाचा अधिकारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते रामलल्लाची प्रतिष्ठापना होत आहे. त्यामुळे लोकशाहीच्या मार्गाने कोणाला कुठे जायचं ते त्यांनी ठरवावे.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT