Devendra Fadnavis : 'महाराज ही रणजीची नव्हे IPLची टीम, अन्...' ; फडणवीसांचं उदयनराजेंना उद्देशून विधान!

Udayanraje Bhosale : देवेंद्र फडणवीस अन् उदयनराजेंच्या टोलेबाजीमुळे कराडमधील कार्यक्रमाची जोरदार चर्चा!
Devendra Fadnavis and Udayanraje Bhosale
Devendra Fadnavis and Udayanraje BhosaleSarkarnama

Karad News : कराडच्या शिवाजी स्टेडियमवर भाजपाचे लोकसभा प्रभारी डाॅ. अतुल भोसले यांनी कृष्णा कृषी आणि औद्योगिक प्रदर्शानाचे आयोजन केले आहे. याठिकाणी बोलताना डाॅ. अतुल भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमला निधी उपलब्ध करण्याची मागणी केली.

यानंतर भाषणाला आलेले उदयनराजे भोसले यांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आयपीएल आणि रणजी क्रिकेट मॅचवरून टोलेबाजी रंगलेली पाहायला मिळाली. या टोलेबाजीवरून मंत्रीपदाची लाॅटरी मिळावी, असा सूचक वक्तव्य उदयनराजेंकडून करण्यात आले. या सर्व प्रकारावर उपस्थितांनी खळखळून हसत दाद दिली.  

कृष्णा उद्योग समुह आणि कृष्णा कृषी परिषद यांच्याकडून 17 ते 22 जानेवारी असे कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. त्यांचे उद्घाटन बुधवारी पार पडले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis), खासदार उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रराजे भोसले, कृष्णा उद्योग समुहाचे प्रमुख डॉ. सुरेश भोसले, भाजप लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, विनायक भोसले, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, आमदार जयकुमार गोरे, रामकृष्ण वेताळ, मनोज घोरपडे, माजी आमदार आनंदराव पाटील, माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Devendra Fadnavis and Udayanraje Bhosale
Adam Mastar : रे-नगरमुळे माझं डिपॉझिट जप्त झालं होतं : आडममास्तरांनी सांगितली 'ती' आठवण!

खासदार उदयनराजे(Udayanraje Bhosale) भोसले म्हणाले, 'अतुल बाबांनी छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमबाबत केलेली सूचना अंमलात यावी आणि लवकरात लवकर स्टेडियमची सुधारणा व्हावी. याठिकाणी पहिली जी रणजी ट्राॅफी असेल, त्याचं कॅप्टन म्हणून उपमुख्यमंत्र्यांनी यावं. तुमच्या अध्यक्षतेखाली मॅच व्हावी. आता कितीही काही केलं तरी आम्ही तुमची मित्रमंडळी आहोत, तेव्हा त्या टीममध्ये आम्हांला घ्या. राखीव खेळाडूत (रिझर्व्ह) ठेवू नका. मी सांगतो टीममध्ये कोणाला घ्यायचं आणि घ्यायचं नाही. सध्या मी बोललो असलो तरी स्टेजवरील सगळे तज्ञ आहेत. तेव्हा या सगळ्यांना टीममध्ये घ्या.' असे शेवटी म्हणाले. 

यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'बोलता- बोलता उदयनराजे भोसले म्हणाले रणजीची टीम आहे, अन् मला बाहेर ठेवू नका. महाराज ही रणजीची नाही तर आयपीएलची टीम आहे. या आयपीएलच्या टीमचे मालक तुम्हीच आहात. त्यामुळे टीममध्ये कोणाला आत ठेवायचं आणि बाहेर ठेवायचं ते तुम्हालाच ठेवायचं आहे. तेव्हा तुम्ही आम्हाला ठेवा म्हणजे झालं.'   

Devendra Fadnavis and Udayanraje Bhosale
Kolhapur Politics : खासदार धैर्यशील मानेंना सतेज पाटलांची धास्ती? भरकार्यक्रमात केलं 'हे' विधान

फडणवीसांसाठी मागवली आळंदीहून बैलजोडी -

देवेंद्र फडणवीसांनी बैलगाडी शर्यती सुरू व्हाव्यात म्हणून मोठे प्रयत्न केले. त्यामुळे बैलगाडीतून त्यांची मिरवणूक काढायची आहे. मात्र या नियोजनामुळे क्षणभर माझे काळजाचे ठोके चुकले होते. पळणारा बैल तुम्ही फडणवीसांच्या गाडीसमोर लावला होता. या दरम्यान, चूकूनही काही झालं असतं तर जय हिंद- जय महाराष्ट्र माझं व्हायला नको. त्यामुळे शांतेत बैलगाडी ओढणारी खास आंळदीवरून बैलजोडी आणण्यात आली आहे. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा मुलगा बैलगाडी चालवत असल्याचे देवेंद्र फडणवीसांकडे पाहून जाणवले असे, अतुल भोसले(Atul Bhosle) यांनी यावेळी म्हटले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com