Raju Shetti - Vishal Patil  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha Election 2024 : विशाल पाटलांचं ठरलं, आता माघार नाहीच..! 'या' चिन्हावर लढणार तर शेट्टींना पुन्हा...

Deepak Kulkarni

Loksabha Election News : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदारपणे सुरू आहे. राज्यातील काही जागा सोडल्या तर सर्वच लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यात सांगलीत काँग्रेसचे नेते विशाल पाटलांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे सांगलीत चौरंगी लढत होणार आहे.

त्याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विशाल पाटलांना लिफाफा तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला शिट्टी हे चिन्ह बहाल करण्यात आलं आहे. त्यामुळे सांगलीतून पाटलांसाठी 'लिफाफा' लकी ठरणार का, तर हातकणंगलेतून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींची 'शिट्टी' दिल्लीत वाजणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

सांगली लोकसभेची जागा शिवसेना (ठाकरे गट) लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या जागेवरून विशाल पाटील Vishal Patil आक्रमक झाले असून त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशाल पाटलांच्या बंडखोरीमुळे ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना फटका बसण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे राजू शेट्टींनी Raju Shetti मात्र यंदा स्वाभिमानीच्या माध्यमातून खासदारकीसाठी आपली सगळी ताकद पणाला लावली आहे. त्यांनी मोठं शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्जही दाखल केला होता.त्यामुळे आता सांगली आणि हातकणंगले मतदारसंघातील लढतींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभा निवडणुकीसाठी दाखल अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सांगलीतील काँग्रेस नेते, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी आपला अपक्ष अर्ज कायम ठेवला. विशाल पाटलांच्या या निर्णयामुळे सांगलीत आता चौरंगी लढत होणार आहे.

दरम्यान, या बंडखोरीचा फायदा भाजपला होण्याची शक्यता असल्याने काँग्रेसच्या नेत्यांनी विशाल पाटलांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. त्याला मात्र अपयश आल्याने महाविकास आघाडीमध्ये MVA अस्वस्थता निर्माण झाली आहे. आता कोणत्याही क्षणी विशाल पाटील यांच्यावर कारवाईचे संकेत दिले जात असून, त्यांच्यावर काय कारवाई होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

सांगली SANGLI लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील, भाजपाचे उमेदवार संजयकाका पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. सांगली लोकसभेसाठी एकूण 21 उमेदवार रिंगणात असणार आहेत. प्रत्येक बूथला दोन ईव्हीएम मशीन लावावे लागणार आहेत. विशाल पाटलांच्या बंडखोरीमुळे सांगलीत महायुतीच्या उमेदवाराला फटका बसून भाजपच्या उमेदवाराला फायदा होणार असल्याचे बोलले जाते.

तर हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने विरुद्ध राजू शेट्टी अशी लढत होणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टींचा पराभव करुन धैर्यशील माने हे जायंट किलर ठरले होते. हा पराभव शेट्टींच्या चांगलाचा जिव्हारी लागला होता. त्याच पराभवाचा वचपा काढण्यासाठी शेट्टींनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT