Prakash Awade, Dhairyasheel Mane Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Loksabha Election 2024 : लोक खासगीत सांगतात, विद्यमानांना बदला, आवाडेंचा 'तो' व्हिडिओ व्हायरल

Prakash Awade Viral Video : हातकणंगलेच्या मैदानात प्रकाश आवाडेंची चर्चा

Rahul Gadkar

Kolhapur Political News :

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीमध्ये उमेदवारीवरून चुरस निर्माण होत असताना भाजपचे सहयोगी अपक्ष आमदार प्रकाश आवाडे आणि शिवसेनेचे (शिंदे) खासदार धैर्यशील माने यांच्यात कलगीतुरा रंगला आहे.

शिरदवाड (ता. शिरोळ) रस्ते उद्घाटनाच्या कार्यक्रमात अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेच्या खासदारांवर निशाणा लावला आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत असून प्रकाश आवाडे (Prakash Awade) यांच्या लोकसभा उमेदवारीची (Loksabha Election) चर्चा रंगू लागली आहे.

पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांची 'जगात भारी' अशी चर्चा आहे; पण इथे कोण आहे? तो आपल्याला काय देणार? आतापर्यंत त्याने काय दिले, याची उत्तरे लोक मागणार आहेत, भाजपच्या जनसंपर्क अभियानातून घरोघरी चाललेल्या कार्यकत्याना विचारा. यांना बदला असे लोक हळूच सांगत आहेत, अशी टीका करतानाच आमदार प्रकाश आवाडे यांनी खासदार धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांना नाव न घेता टोला लगावला आहे.

त्याचबरोबर स्थानिक भाजपच्या नेत्यांना देखील टार्गेट करत आवडे यांनी खडे बोल सुनावले आहेत. चार हात लांब ठेवून राजकारण सुरू आहे. ते कोण करतंय, हे सगळ्यांना माहिती आहे, असे म्हणत माजी आमदार सुरेश हाळवणकर यांचेही नाव न घेता टोला लगावला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुश्रीफ आणि सतेज पाटलांवर निशाणा

यावेळी आमदार आवाडे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि माजी पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनाही सोडले नाही. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे नाव घेत, तुम्ही सत्तेत असताना मंत्री होता मात्र, तुमचा त्रास कधी झाला नाही. पण सत्तेतील दोन मंत्र्यांचा त्रास झाला. सध्या मुश्रीफसाहेब युतीत आल्याने त्यांचा त्रास कमी झाला, असे सांगत आवाडे यांनी चिमटा काढला.

(Edited by Avinash Chandane)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT