Kolhapur News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे आणखी काही आमदार भाजपच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेस नेत्यांकडून चव्हाण यांच्या व्यतिरिक्त एकही आमदार काँग्रेस सोडणार नसल्याचा दावा केला आहे. पण काँग्रेसचा बालेकिल्ला कोल्हापुरमध्येच काँग्रेसला धक्का देण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. (Maharashtra Politics)
'जिल्ह्यातील एकनिष्ठ नेते भाजपमध्ये आले तर आश्चर्य वाटू नये. राजकारणात काम करणाऱ्या व्यक्तीला आपले भवितव्य भाजपमध्ये वाटत आहे. राज्यात भाजपचे वातावरण झाले आहे. त्यामुळे अनेक नेते भाजपमध्ये येतील. त्याला कोल्हापुरही अपवाद राहणार नाही.' असे सूचक विधान खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी केले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीत सहभागी झाले. त्यानंतर बाबा सिद्दीकी आणि काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण महायुतीत आले. पुढच्या वेळी अनेक लोक भाजपमध्ये येतील, असा दावा देखील धनंजय महाडिक यांनी केला. 'गाव चलो' अभियानावर टीका करणाऱ्यांचा देखील महाडिक यांनी समाचार घेतला.
महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा प्रचंड भ्रष्टाचार झाला. ते सरकार स्थगितीचे, ठप्प आणि भ्रष्टाचार करणारे होते. कोव्हिडच्या काळात पैसे खाण्याचे काम कोल्हापुरसह राज्यातून झाले, असा आरोप महाडिक यांनी केला. भाजपला देशात सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. 'अबकी बार चारसौ पार' हे व्हिजन घेऊन भाजप कामाला लागली असल्याचे महाडिक यांनी सांगितले.
(Edited By Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.