Satara Loksabha News : महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनाच तिकीट मिळाल्याचे त्यांचे समर्थक सांगत आहेत, तर दिल्लीतील मुक्काम उरकून खासदार उदयनराजे उद्या (बुधवारी) साताऱ्यात (Satara) येत असून, त्यांचे जिल्ह्यात जंगी स्वागत केले जाणार आहे. त्यासाठी पोस्टर्स, हारतुरे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासह इतर थोर नेत्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जाणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यासाठी तब्बल 25 जेसीबींच्या साह्याने खासदार उदयनराजेंवर पुष्पवृष्टी केली जाणार आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीला भाजपचे (BJP) हायकमांड व केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी हिरवा कंदील दिल्याने दिल्लीतील आपला मुक्काम आटोपून खासदार उदयनराजे भोसले उद्या (बुधवारी) साताऱ्यात येत आहेत. त्यांच्या स्वागताची त्यांच्या समर्थकांनी जय्यत तयारी केली आहे. ठिकठिकाणी पोस्टर्स, बॅनर्स तसेच स्वागतासाठी पुष्पवृष्टी करण्यासाठी जेसीबींचे बुकिंग केले आहे. Maharashtra Latest News Politics
पुणे येथून येणाऱ्या खासदार उदयनराजे (Udayanraje Bhosale) यांच्या स्वागतासाठी समर्थक कामाला लागले असून, ‘आरंभ है प्रचंड...’ या मथळ्याखाली सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्या आहेत. शिरवळ येथील नीरा नदी पूल येथे जिल्ह्याच्या सीमेवर उदयनराजे यांचे दुपारी तीन वाजता स्वागत करण्यात येणार असून, त्यानंतर शिरवळ (Shirval) बस स्थानक, लोणंद फाटा, धनगरवाडी, बावडा फाटा, खंडाळा बस स्थानक, वेळे, सुरूर फाटा, कवठे येथील किसन वीर पुतळा परिसर, जोशीविहीर, भुईंज, पाचवड फाटा, उडतरे, आनेवाडी, लिंब फाटा, खेड फाटा, बाँबे रेस्टॉरंट चौक, विसावा नाका, जिल्हा परिषद चौक येथे स्वागत स्वीकारल्यानंतर ते पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, यशवंतराव चव्हाण किसन वीर पुतळ्यास अभिवादन करणार आहेत.
यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णा भाऊ साठे, लहुजी वस्ताद यांच्या पुतळ्यास अभिवादन करत ते शाही मशीद परिसरात येणार आहेत. येथून गोलबागेतील थोरले प्रतापसिंह महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून जलमंदिर येथे दाखल होणार आहेत, अशी माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे. साताऱ्यात आल्यानंतर उदयनराजे यांच्यावर 25 जेसीबींमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार असून, यानंतर दोन क्रेनच्या मदतीने भलेमोठे दोन हार घालून त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. Latest News on Maharashtra Politics
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.