Solapur, Madha Loksabha : मराठा समाजाचा मोठा निर्णय; सोलापूर, माढ्यातून देणार प्रत्येकी एक तगडा उमेदवार

Maratha community big decision : उमेदवारीसाठी सकल मराठा समाजाच्या संपर्कात काही माजी खासदार, निवृत्त सनदी अधिकारी आहेत. त्यामुळे आम्ही सत्ताधारी आणि विरोधकांच्या तोडीचे उमेदवार प्रत्येक मतदारसंघात देण्याचा प्रयत्न करणार आहोत, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
Mauli pawar
Mauli pawarsarkarnama
Published on
Updated on

Solapur, 26 March : माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघांसाठी सकल मराठा समाजाने मोठा निर्णय घेतला आहे. या दोन्ही मतदारसंघांतून प्रत्येकी एक पण तगडा उमेदवार देण्यात येणार आहे. या दोन्ही मतदारसंघांसाठी आमच्याकडे मोठी नावे आहेत, त्यामुळे आम्ही महाविकास आघाडी आणि महायुतीला तगडी फाइट देऊ, असे सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी सांगितले.

दरम्यान, उमेदवारीसाठी सकल मराठा समाजाच्या (Maratha Samaj) संपर्कात काही माजी खासदार, निवृत्त सनदी अधिकारी आहेत. त्यामुळे आम्ही सत्ताधारी आणि विरोधकांच्या तोडीचे उमेदवार प्रत्येक मतदारसंघात देण्याचा प्रयत्न करणार आहोत, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Mauli pawar
Satej Patil Kolhapur News : शेट्टींना काँग्रेस, राष्ट्रवादीचा विरोध; कार्यकर्त्यांनी सतेज पाटलांसमोर मांडली भूमिका

सकल मराठा समाजाच्या वतीने लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) प्रत्येक मतदारसंघातून ५०० उमेदवार देण्याचा निर्णय झाला होता. आता त्याऐवजी प्रत्येक मतदारसंघात एकच उमेदवार देण्यात येणार आहे. तो उमेदवार ताकदवान असेल, अशी काळजी समाजाच्या वतीने घेण्यात येत आहे. तोडीस तोड उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे, असेही माऊली पवार यांनी नमूद केले.

मराठा समाजाला ५० टक्क्यांमधून ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण द्यावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या वर्षभरापासून लढा उभारला आहे. मात्र, राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र आरक्षण दिले आहे. मात्र, ते मराठा समाजाला मान्य नाही, त्यामुळे सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने लोकसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे, त्यानुसार आता ५०० उमेदवार एका मतदारसंघात उभारण्याऐवजी एका मतदारसंघात एकच उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Mauli pawar
Shirdi Lok Sabha Election 2024 : शिर्डीतून सदाशिव लोखंडेंची उमेदवारी 'फिक्स'?

सकल मराठा समाजाच्या वतीने पूर्वी प्रत्येक मतदारसंघातून 500 उमेदवार देण्याचा निर्णय झाला होता, परंतु त्या निर्णयाचा सत्ताधारी पक्षाला फायदा होत असल्याचे लक्षात आल्याने तो निर्णय रद्द करण्यात आल्याचेही माऊली पवार यांनी या वेळी स्पष्ट केले. सोलापूर आणि माढ्यातून उभारण्यात येणाऱ्या उमेदवाराचा खर्चही लोकवर्गणीतून करण्यात येणार आहे, त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातील मराठा समाजाचे चेहरे कोण असणार, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

दरम्यान, मराठा समाजाला 50 टक्क्यांमधून ओबीसी आरक्षण देणाऱ्या उमेदवाराला आम्ही आम्ही पाठिंबा देणार आहोत, असेही माऊली पवार यांनी या वेळी स्पष्ट केले

R

Mauli pawar
Nashik Lok Sabha Election 2024 : नाशिकमध्ये यंदा भुजबळांचे 'ओबीसी' कार्ड चालणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com