Sangli Lok Sabha Constituency : ठाकरेंचा 'चंद्रहार' काँग्रेसला खुपणार; सांगलीत कोण काय भूमिका घेणार?

Lok Sabha Election 2024 : चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्यास महाविकास आघाडीत उद्रेक होण्याची शक्यता
Uddhav Thackeray, Chandrahar Patil
Uddhav Thackeray, Chandrahar PatilSarkarnama
Published on
Updated on

Sangli Political News : महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असा समझाेता झाला आहे. यासह उद्धव ठाकरे यांनी सांगलीतून डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीची घोषणा केलेली आहे. यावरून सांगली काँग्रेस कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, आज ठाकरे गटाकडून उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. यात सांगलीतून चंद्रहार पाटलांचे नाव कायम झाल्यास काँग्रेस आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. परिणामी सांगली लोकसभा मतदारसंघातील आघाडीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. Sangli Lok Sabha Constituency

सांगली लोकसभा मतदारसंघातील (Sangli Lok Sabha) वादात मंगळवारचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप निश्‍चित होण्याआधी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यावरूनच सांगली महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. काँग्रेसला विचारात न घेता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उमेदवारीची घोषणा कशी काय केली, असा सवाल काँग्रेस नेत्यांकडून केला जात आहे, तर प्रसंगी बंडखोरीची भाषाही केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या जाहीर होणाऱ्या यादीत चंद्रहार पाटलांचे नाव असणार का? याकडे लक्ष लागले आहे. तसेच त्यांचे नाव आल्यास काँग्रेस नेमकी भूमिका काय घेणार? नाव नसेल तर चंद्रहार पाटलांची भूमिका काय? अशी चर्चाही त्यानिमित्त सुरू आहे.

Uddhav Thackeray, Chandrahar Patil
Lok Sabha Election 2024 : ज्यांना सुनेत्रा वहिनींचे भय वाटते..! जानकरांच्या उमेदवारीवर तटकरे काय म्हणाले?

ठाकरे गटाच्या जाहीर होणाऱ्या यादीत चंद्रहार यांचे नाव असेल का, याकडे महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, ठाकरे यांच्या खेळीला काँग्रेसने शह द्यावा, यासाठी जिल्ह्यातील नेत्यांनी दबाव कायम ठेवला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यावर चर्चेसाठी आमदार विश्‍वजित कदम यांना बोलावले आहे. ही बैठकीत दिल्लीत होणार आहे, त्याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

शिवसेनेकडून चंद्रहार (Chandrahar Patil) यांच्या नावाचा अधिकृत यादीत समावेश केल्याचे बोलले जाते. पण तसे झाल्यास काँग्रेसची भूमिका काय असणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे. याबाबत काँग्रेसच्या प्रदेश नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहेत. सांगलीसह अद्याप पाच जागांवरील वाद कायम आहे. तो सुटल्याशिवाय शिवसेना यादी जाहीर करत असेल तर काँग्रेसने मागे पाहू नये, आपली यादी जाहीर करावी, असा आक्रमक पवित्रा घेतला जाऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.

Uddhav Thackeray, Chandrahar Patil
Kangana Ranaut : सुप्रिया श्रीनेत यांच्या 'कंगना'च्या पोस्टवरून काँग्रेस भाजपमध्ये राडा !

सांगली मतदारसंघावरून महाविकास आघाडीतील वातावरण अद्याप तापलेले आहे. काँग्रेस ‘थंडा करके खावो’ भूमिकेत आहे. हा वाद दिल्लीत पोहाेचला आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi), अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी प्रमुख नेत्यांची प्राथमिक चर्चा झाली आहे. त्यामुळे काँग्रेस शिवसेनेला शह दिला जाणार का? सांगलीसाठी काँग्रेसचे सगळेच नेते आग्रही आहेत. त्याची दखल दिल्लीत घेतली जाणार का, याकडे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा करून आघाडी घेतली.मात्र, जिल्ह्यात शिवसेनेची अवस्था गोंधळलेली आहे. महाविकास आघाडीचे निश्‍चित ठरेपर्यंत शिवसैनिक वगळता अन्य घटक पक्षातील लोक जवळ यायला तयार नाहीत. काँग्रेसने बंड करायचे ठरवले तरी ही समस्या डोकेदुखी ठरू शकते, याची जाणीव शिवसेनेला आहे. या घडीला काँग्रेस आणि राष्‍ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते शांत आहेत. महाविकास आघाडीचे मिटल्याशिवाय घटक पक्षांना हालचाल करता येणार नाही, हे स्पष्ट आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Uddhav Thackeray, Chandrahar Patil
Nanded BJP News : चिखलीकरांच्या विजयाची अशोक चव्हाणांना गॅरंटी...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com